हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हाय व्हॅल्यू चेक क्लिअरिंगसाठीचे नियम बदलले आहेत. चेक पेमेंटमध्ये ग्राहकांची सुरक्षा वाढवण्यासाठी आणि चेक लीफ टेंपरिंगमुळे फसवणूकीचे प्रमाण कमी करण्यासाठी RBI ने एक नवीन सिस्टम आणली आहे. RBI ने 50 हजार किंवा त्याहून अधिकच्या सर्व चेकसाठी पॉझिटिव्ह पे (Positive Pay) सिस्टम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या सिस्टम अंतर्गत, आता चेक देण्याच्या वेळी ग्राहकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे चेक भरण्यासाठी बँकेशी संपर्क साधला जाईल.
ही सिस्टम देशात जारी केलेल्या एकूण चेकचे व्हॉल्युम आणि व्हॅल्यू च्या आधारे अनुक्रमे सुमारे 20% आणि 80% कवर करेल. या उद्देशाने काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जातील, असे आरबीआयने म्हटले आहे.
नवीन सिस्टम कशी काम करेल?
या पॉझिटिव्ह पे सिस्टम अंतर्गत खातेदाराला दिलेला चेक लाभार्थ्यास देण्यापूर्वी, चेकची तारीख, देयकाचे नाव, खाते क्रमांक, रक्कम इत्यादींचा तपशील चेकच्या पुढील व उलट बाजूच्या फोटोसह शेअर करणे आवश्यक आहे. लाभार्थी जेव्हा हा चेक भरण्यासाठी जमा करतात तेव्हा बँकेच्या पॉझिटिव्ह पेतून देण्यात आलेल्या चेक डिटेल्सची तुलना केली जाईल. जर डिटेल्स जुळत असेल तर चेक क्लेअर केला जाईल.
व्याजदरामध्ये कोणताही बदल नाही
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय चलनविषयक धोरण समितीने (एमपीसी-चलनविषयक धोरण समिती) व्याजदरावर निर्णय दिला आहे. व्याजदरामध्ये कोणताही बदल झाला नाही. मात्र , यंदाच्या वर्षात रिझर्व्ह बँकेने लॉकडाऊनपाहता व्याजदरामध्ये 1.15 टक्क्यांनी 2 वेळा कपात केली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.