सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
मिरज तालुक्यातील बेळंकी येथील सेवानिवृत्त पोलिस हवालदार अण्णासाहेब गुरूसिध्द गवाणे, मुलगा महेश अण्णासाहेब गव्हाणे व सौ. मालन अण्णासो गवाणे यांनी राहत्या घरी तिघांनी आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सावकारी अधिनियमानुसार चौदाजणाविरोधात मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
तालुक्यातील बेळंकी येथे पोलिस हवालदार अण्णासो गुरूसिद गव्हाणे यांनी पत्नी मालन गव्हाणे व मुलगा महेश गव्हाणे यांच्यासह राहत्या घरी गळफात घेवून आत्महत्या केली. शेअर मार्केटमध्ये झालेल्या तोटा व सावकारीचा तगादा या गोष्टीमुळेच आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. महेश गव्हाणे यांनी आत्महत्येपूर्वी सावकारी करणारे चौदा जणांची नावे चिठ्ठीमध्ये लिहिली होती. या सावकारांनी २२ टक्क्यांनी पैसे गव्हाणे यांना दिले होते. गव्हाणे यांना फोन वरून धमकी आणि वसुलीचा तगादा लावला होता. मानसिक त्रास दिल्यामुळेच गव्हाणे कुटूंबियांनी आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.
गव्हाणे कुटूंबियांना आत्महत्येस प्रवृत्त केलेल्यांमध्ये यामध्ये विवेक घाटगे, बेळगाव, किरण होसकोटे, बेळगाव, राजीव शिंगे, रायबाग, विनायक बागेवाडी, हारूगिरी, अमित कुमार कांबळे, मिरज, प्रविण बनसोडे, मिरज, पुजा शिंगाडे, मिरज, शैलेंद्र शिंदे, मिरज, बाळासाहेब माळी, कवठेमहांकाळ, कमलेश कलमाडी, नरवाड, अरूण थोरात सांगली, संतोष मगसुंळी, हारूगिरी, जितेंद्र पाटील, सांगली, जुबेर मोकाशी कुरूंदवाड यांच्या विरोधात सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.