साजिद नाडियाडवालाने ४०० कर्मचाऱ्यांना दिला मदतीचा हात,पीएम फंडलाही करणार मदत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगात सध्या भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. २०० हुन अधिक देशांमध्ये पसरलेल्या या विषाणूमुळे आतापर्यंत हजारो नागरीकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.सामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत कोणालाही कोरोनाने सोडलं नाही. याला अटकाव घालण्यासाठी मोदी सरकारने २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केलेला आहे.

मात्र याचा आर्थिक परिणाम विविध क्षेत्रात रोजंदारीवर काम करत असलेल्या कामगारांच्या जीवनावर झाला आहे. यामध्ये बॉलिवूड चित्रपटसृष्टीचाही समावेश आहे. लॉकडाऊनमुळे अनेक चित्रपटांचे चित्रीकरण बंद पडले आहे. परिणामी चित्रपटसृष्टीत रोजंदारीवर कामे करणाऱ्या पडद्यामागील कामगारांना प्रचंड आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर निर्माता आणि दिग्दर्शक साजिद नाडियाडवाला याने तब्बल ४०० कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच त्यांनी पंतप्रधान सहाय्यता निधीसाठीही काही रक्कम देऊ केली आहे.

साजिद यांनी एक पत्रक जाहीर करुन ही माहिती दिली. ‘नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट’ आणि ‘नाडियाडवाला ग्रँडसन फाउंडेशन’ या संस्थांतर्फे त्यांनी ही मदत जाहीर केली आहे.

साजित यांनी या पत्रकामध्ये कोणाला मदत करणार याची एक यादी दिली आहे.

१. पंतप्रधान सहाय्यता निधी

२. मुख्यमंत्री सहाय्यता निधी

३. मोशन पिक्चर्स अँड टिव्ही प्रोड्यूसर्स वेलफेयर ट्रस्ट

४. श्री भैरव सेवा समिति

५. फिल्म इंडस्ट्री वेलफेयर ट्रस्ट

६. ‘नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट’ कंपनीतील ४०० कर्मचाऱ्यांना १० हजार रुपयांचा बोनस

अशा स्वरुपात साजित नाडियाडवाला यांनी मदत जाहीर केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.