सलमानच्या बिईंग ह्युमन ची चॅरिटी केवळ दिखावा आहे – अभिनव कश्यप 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडचे दिगदर्शक अभिनव कश्यप याच्या एका पोस्टवरून सलमान खानच्या कुटुंबावर बोट उचलले गेले होते. त्यानंतर त्याने माझे ई मेल अकॉउंट कुणीतरी लॉग इन केले होते असा खुलासा केला होता. पण त्याचवेळी खान कुटुंबियांना एवढा त्रास का होतो आहे? असा प्रश्नही विचारला होता. अभिनव कश्यपने आता मात्र पुन्हा त्याच्या फेसबुकवरून सलमान खानच्या बिईंग ह्युमन ची चॅरिटी केवळ दिखावा आहे अशी पोस्ट केली आहे. ज्यामुळे पुन्हा एका नव्या वादाला मार्ग मोकळा झाला आहे.

‘महोदय सलीम खान यांची सर्वात मोठी कल्पना ही being human आहे. त्यांनी चॅरिटीचा केवळ दिखावा केला आहे. दबंग च्या शूटिंगच्या वेळी माझ्या डोळ्यासमोर केवळ ५ सायकली वाटल्या आणि दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात ५०० सायकली वाटल्याचे छापून आले. हे सगळे सलमान खानची मवाली, गुंड ही प्रतिमा सुधारण्यासाठी करण्यात आले कारण कोर्टातील गुन्हेगारीच्या केसेस मध्ये माध्यमे आणि न्यायाधीश थोडीशी दया दाखवतील असा यामागचा उद्देश असल्याचे’ त्यांनी लिहिले आहे. आज ही संस्था ५०० रुपयांची जीन्स ५००० रुपयांना विकते. तसंच या संस्थेचा वापर आर्थिक गैरव्यवहार करण्यासाठी केला जातो. असेही त्यांचे म्हणणे आहे.

अभिनेता सलमान खान आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मिळून माझं करिअर संपवलं, असे धक्कादायक आरोप दिग्दर्शक अभिनव कश्यपने मंगळवारी केले. फेसबुकवर भलीमोठी पोस्ट लिहित अभिनवने त्याच्या मनातील खदखद बोलून दाखवली. अभिनवची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.अभिनवने यापूर्वी केलेल्या आरोपांवर सलीम खान यांनी प्रतिक्रिया दिली होती. बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सलीम खान म्हणाले, “हो. आम्हीच सगळं खराब केलंय ना. आधी तुम्ही जाऊन त्यांचे चित्रपट पाहा आणि त्यानंतर आपण बोलू. त्यांनी पोस्टमध्ये माझं नाव लिहिलंय ना. त्यांना कदाचित माझ्या वडिलांचं नाव माहीत नसेल. त्यांचं नाव आहे राशिद खान. त्यांनी आमच्या आजोबा-पणजोबांचंही नाव लिहिलं पाहिजे होतं. त्यांना जे काय करायचं असेल ते करू द्या. त्यावर प्रतिक्रिया देऊन मी माझा वेळ वाया घालवणार नाही.”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.