“बदनामीची मोहीम उद्या तुमच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही”; संजय राऊत यांचा भाजपला इशारा

0
119
SANJAY RAUT
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ईडीच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. कंपनीवर मंगळवारी कारवाई करण्यात आली. या कारवाईवरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप व किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे. “हे शेकडो, हजारो कोटी खर्च करून निवडणुका लढत आहात तो पैसा कुठून येतो? मोकळेपणाने श्वास घेण्याच्या स्वातंत्र्यावरचं हे संकट आहे. पण हे काही काळच राहणार. आज आमच्या विरोधात बदनामीची मोहीम आहे. हीच मोहीम उद्या त्यांच्यावर उलटल्या शिवाय राहणार नाही,” असा इशारा राऊत यांनी दिला.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले कि, ईडीने दोनचार ठिकाणी काय कारवाया केल्या म्हणून महाराष्ट्रातील राजकारण तापत नाही. दिल्लीत ईडीचे हेड क्वॉर्टर आहे. पण पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात भाजप विरोधी सरकार आल्याने ईडीचं हेड क्वॉर्टर महाराष्ट्र आणि बंगालमध्ये आले आहे. या ना त्या कारणाने विरोधकांना त्रास देण्यासाठी हे सर्व सुरू आहे. आम्ही पंतप्रधान कार्यालयात आणि ईडीकडे सर्व पुरावे दिले आहेत. पंतप्रधान कार्यालयातून मला पोचपावती मिळाली आहे. मात्र, आमच्या पुराव्यांकडे कुणाचे लक्ष नाही. केवळ सिलेक्टेड कारवाई सुरू आहे.

काल पाटणकरांवर कारवाई केली. त्या कारवाई मागचे सत्य काही तज्ज्ञ मंडळींनी समजून घ्यावे हे नीट समजून घ्या. चुकीच्या माहितीवर आधारीत काही गोष्टी प्रसारीत केल्या जात आहेत. हळूहळू त्या गोष्टी बाहेर येतील. ही आमच्या विरोधातील बदनामीची मोहीम आहे. हीच मोहीम उद्या त्यांच्यावर उलटल्या शिवाय राहणार नाही. मी पूर्ण विश्वासाने सांगतो आत्मविश्वासाने सांगतो हे तुमच्यावर उलटणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here