सांगली : हॅलो महाराष्ट्र – सांगलीमध्ये आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये आरोपी मुलाने आपल्या वृद्ध आईची दगडाने ठेचून हत्या (Killed) केली आहे. शांताबाई अण्णाप्पा कोरे असे मृत महिलेचे नाव आहे तर सुरेश आण्णाप्पा कोरे असे आरोपी मुलाचे नाव आहे. ही घटना आज दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास घडली.
काय आहे नेमके प्रकरण?
माडग्याळ येथे सुरेश कोरे व त्यांची आई शांताबाई कोरे राहत होते. दरम्यान रविवारी सकाळी शेजारी एक वृद्ध व्यक्ती मयत झाली होती. मयत व्यक्तीच्या रक्षा विसर्जनासाठी दोघेही गेले होते. शांताबाई कोरे घराजवळील शेतामध्ये काम करत होत्या. सुरेशने तेथे जाऊन तू शेजारच्या बायकांना का बोलतेस, अशी विचारणा करत त्यांच्या डोक्यात दगड घातला(Killed) .यावेळी शांताबाई जोरजोराने ओरडल्या.
हा ओरड ऐकून शेजारी शेळ्या चारत असलेल्या महिलांनी मोठमोठ्याने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. यानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले. यानंतर लोकांनी याची माहिती तातडीने पोलिसांनी (Killed) दिली. या घटनेची माहिती मिळताच उमदी व जत दोन्ही पोलीसांनी धाव घेऊन आरोपी सुरेश कोरे याला अटक केली. पोलीस उपधीक्षक रत्नाकर नवले यांनी घटनास्थळाची पाहणी करत पुढील तपास करण्याचे आदेश पोलिसांना दिले.
हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती