“किरीट सोमय्यांच्या वादात पडू नका, अन्यथा…”; संजय राऊतांचा चंद्रकांतदादांना इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आज आरोप केला आहे. यावेळी त्यांनी सोमय्यांची बाजू घेणाऱ्या भाजप नेत्यांनाही सूचक इशारा दिला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमय्या यांची बाजू घेऊ नये. पाटील तुम्ही यात पडू नका. बेगाने शादी में नाचू नये. लोक सोमय्यांची धिंड तर काढतीलच, पण तुमचेही कपडे फाटतील,” असा इशारा राऊतांनी दिला.

संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात पुनर्वसनाच्या नावाखाली राज्यात मोठा घोटाळा झाला आहे. सोमय्या यांनी प्रत्येकाकडून किमान 25 लाख रुपये घेतले आहेत. या पुर्नवसन प्रकल्पाच्या घोटाळ्यातील कागदपत्रे घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. आता सोमय्या यांचे घोटाळे बाहेर निघाल्यानंतर लोक त्यांची धिंड काढणार आहेत. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी यात पडू नये, अन्यथा तुम्हीही उघडे पडाल, असे राऊत यांनी म्हंटले.

सोमय्या यांनी केलेल्या घोटाळ्या प्रश्नी मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. ते असे करणार नाहीत मी अगोदर बोललो आहे. फडणवीसांशी झालेल्या चर्चेवेळी किरीट सोमय्या यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर पैसे उकळले, असे सांगितले आहे. किरीट सोमय्याने गेल्या काही वर्षात साडे सात हजार कोटी रुपये गोळा केले आहेत. ईडी आणि सीबीआयच्या नावावर वसुली केली. दिल्लीतील मंत्र्यांच्या नावावर, अमित शाह यांच्या नावावर पैसे उकळले. त्यामुळे भाजप नेत्यांनी आता तरी सोमय्या याची बाजू घेऊ नये, अन्यथा ते उघडे पडतील, असे राऊत यांनी म्हण्टले

काय केले आहेत राऊतांनी आरोप ?

पवई पेरु बाग प्रकल्पाच्या अंतिम यादीवर त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सही केली. 433 लोकांकडून 25 लाख रुपये घेण्यात आले. हा 200 ते 300 कोटींचे प्रकरण आहे. ईडी आणि आर्थिक गुन्हे शाखा यांना ही कागदे दाखवत आहोत. किरीट सोमय्या सांगायचे की देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर 50 कोटी उकळले. देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर किरीट सोमय्यांनी घेतले. हा घोटाळा 400 कोटींचा असल्याची आम्हाला शंका आहे, असे राऊत यांनी म्हंटले आहे.

Leave a Comment