“त्यांनी ज्या प्रकारच्या नोटा वापरल्या, त्याच्यापुढे आम्ही कमी पडलो”; संजय राऊत यांची प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोवा विधानसभा निवडणुकीवरून महाराष्ट्रातील वातावरण चांगलेच तापले आहे. चार राज्यात निवडणुकीत भाजपने आघाडी मिळवली आहे. निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गोव्यातील प्रभावावरून भाजपवर निशाणा साधला. भाजपने ज्याप्रकारच्या नोटा वापरल्या, त्याच्यापुढे आम्ही कमी पडलो, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली. तसेच अजूनही लढाई संपलेली नाही, असेही राऊत यांनी म्हंटले.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आज जो निवडणुकीचा निकाल लागला आहे. त्यावरून एकच गोष्ट सांगायची कि निवडणुकीत विजय जरी झाला असला तरी विरोधकांना तो चांगल्या प्रकारे पचवता आला पाहिजे. गोवा, उत्तराखंडात विजयाची शक्यता होती, मात्र अपेक्षेहून कमी परफॉर्मन्स मिळाला. त्यांनी ज्या प्रकारच्या नोटा वापरल्या, त्याच्यापुढे आम्ही कमी पडलो, हे खरं आहे.

यूपी आणि गोव्यात विधानसभा निवडणुकीत आम्ही आमच्या परिने लढलो, जय-पराजय अंतिम नसतो. पंजाबमध्ये मोदी आणि शाहांचा चेहरा वापरुन लढूनही यूपीसारखं यश नाहि. भाजपने विजय पचवला पाहिजे,असेही यावेळी राऊत यांनी म्हंटले.