हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. “राज्यातील पोलिसांनी चौकशी केल्यानंतर आता रडत का आहेत. आपले पोलिस सक्षम आहेत. राज्याचे पोलिस किती सक्षम आहेत हे देवेंद्र फडणवसींना चांगलं माहित आहे. त्यामुळे पोलिसांच्या चौकशीला सामोरे जा, असा टोला राऊतांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.
आज संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारमधील नेत्याच्या बाबतीत त्यांची ईडी, सीबीआयकडून चौकशी व्हावी अशी भाजपची भूमिका असते. मग आता महाराष्ट्र पोलिसांकडून तुमची चौकशी होत असेल तर रडताय कशाला? आणि म्हणताय का कि आमची चौकशी होतेय.
सध्या देशाचे पंतप्रधान असल्याचा मोंदीना विसर पडला आहे. माझी भाषा अजिबात बदलणार नाही. मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. भाजपाने त्यांना एकपक्षीय नेते करून ठेवले आहे. मी काही प्रकरण प्रधानमंत्री कार्यालयात दिली आहेत, अशीही माहिती यावेळी राऊत यांनी दिली.