होय… बाळासाहेबांमुळेच महाराष्ट्र सरकार चालते ; संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पाटील यांच्यावर निशाणा साधला. “बाळासाहेब ठाकरे यांचेच शिल्लक आहे म्हणून आज महाराष्ट्र सरकार चालत आहे. एकेकाळी आम्ही अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांचेही ऐकत होतो. तेव्हा चंद्रकांत पाटील कुठेच नव्हते. शरद पवार हे जेष्ठ नेते आहेत. तत्यांचे मार्गदर्शन प्रधानमंत्रीच घेतात. त्यामुळे चंद्रकांतदादांकडे राजकारणाची माहिती कमी असल्याचा टोला राऊतांनी दिला.

संजय राऊत याणी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, शरद पवारांचे मार्गदर्शन नरेंद्र मोदी घेतात. त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन आम्हालाही हवे असते. शेवटी ते एक महाराष्ट्रातील जेष्ठ नेते आहेत. ते मोठे नेते आहेत. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना बऱ्याच गोष्टीची माहीत नाही. त्यांनी अगोदर अभ्यास करावा, असा टोला एआयतानी यावेळी लगावला.

दाऊद तुमच्यासमोर मच्छर, त्याला पकडून घेऊन या…

यावेळी संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, केंद्र सरकारने अगोदर दाऊदला पाकिस्तानातून फरफटत आणले पाहिजे. अमेरिकेने पाकिस्तानमध्ये जाऊन लादेनला मारले तसं भाजपाच्या केंद्र सरकारने दाऊदची गंचाडी पकडून मुंबईला आणला पाहिजे. तो मोठा गुन्हेगार आहे तर त्याला तिथे मोकळा का सोडला आहे. मुळात दाऊद जिवंत आहे की नाही हे आधी तुम्ही स्पष्ट करावे. दाऊद कुठे आहे आणि काय करत आहे हे केंद्र सरकारला माहिती आहे. तुम्ही जगातील इतके मोठे नेते आहात. दाऊद तुमच्यासमोर मच्छर आहे त्याला पकडून घेऊन या,” असे संजय राऊत म्हणाले.

काय केली होती चंद्रकांत पाटील यांनी टीका ?

चंद्रकांत पाटील यांनी टीका करताना म्हंटले होते की, “हा देश उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दाऊदशी ज्यांचा संबंध असल्याचे न्यायालयाने म्हंटले आहे. तरीही त्यांचा राजीनामा घेतिला जात नाही. मग ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे की पवारांशी प्रेरित शिवसेना आहे. आपल्या या महाराष्ट्रात जे चालले आहे त्या प्रक्राबद्दल हसावे कि रडावे हाच प्रश्न पडतो.