सातारा | जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी भाजपच्या डॉ. भोसले गटाच्या साथीने अखेर कराड सोसायटी गटातून विजय मिळवला आहे. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी काँग्रेसचे अँड. उदयसिंह पाटील यांचा पराभव केला आहे. या विजयामुळे कराड तालुक्यात भाजप -राष्ट्रवादीची नवी युती उदयास आली आहे.
सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना 74 तर अडवोकेट उदय पाटील यांना 66 मते मिळाली
कराड सोसायटी गटात गेली 54 वर्ष कै. विलासराव पाटील उंडाळकर यांनी प्रतिनिधित्व केले होते. त्यांच्या निधनानंतर त्यांचे वारस अँड उदयसिंह पाटील यांनी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी अर्ज भरला होता. त्यानंतर सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनीही कराड सोसायटी गटातून अर्ज भरत निवडणुकीसाठी दंड थोपटले होते. मात्र विजयासाठी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी भाजपच्या मांडवातून जावे लागले.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/1342039039598855
सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना विजयासाठी भाजपचे डॉ. अतुल भोसले यांची मदत घ्यावी लागली. मतदानाच्या अगोदर केवळ 12 तास राष्ट्रवादीची गट्टी कराड येथील पंकज हॉटेल येथे जमली. त्यानंतर रविवारी मतदाना साठी एकत्रित दोन्ही गट येत मतदान केले होते. भोसले गटाची साथ सहकार मंत्र्यांना मिळाल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. अखेर आज कराड सोसायटी गटातून सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विजय मिळवत अनेक वर्ष जिल्हा बँकेत जाण्याचे स्वप्न पूर्ण केले.
हे पण वाचा –
शशिकांत शिंदेंचा पराभव कार्यकर्त्यांच्या जिव्हारी ; राष्ट्रवादी कार्यालय फोडले (Video)
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा 7 मतांनी पराभव; पाटणकरांनी मारली बाजी
राष्ट्रवादी आमदार शशिकांत शिंदेंचा अवघ्या 1 मताने पराभव; जावळीतून ज्ञानदेव रांजणे विजयी
भाजप -राष्ट्रवादीची गठ्ठी, उंडाळकरांची इठ्ठी : सहकार मंत्री बाळासाहेब पाटील विजयी
तुरुंगातून निवडणूक लढवून प्रभाकर घार्गेंनी मारली बाजी : राष्ट्रवादीला धक्का
शेखर गोरे यांना धक्का; तब्बल 1080 मतांनी दारुण पराभव
रामराजे निंबाळकर हे सातारा जिल्ह्याला लागलेला कॅन्सर; शेखर गोरेंची जहरी टीका
आ. शशिकांत शिंदे यांच्या पराभवावर चंद्रकांत पाटलांनी दिली ‘हि’ प्रतिक्रिया; म्हणाले…
निवडणुकीत हार जीत ही होतच असते; पराभवानंतर उदयसिंह पाटील उंडाळकरांनी मानले आभार
पराभवानंतर आ. शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..
सहकार पॅनलमधून ऋतुजा पाटील, कांचन साळुंखे विजयी
सातार्यात राडा : शशिकांत शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचं कार्यालय फोडलं
सहकारमंत्र्यांची विजयानंतर हॅलो महाराष्ट्र सोबत बातचीत; काय म्हणाले पहा
गृहराज्यमंत्रांचा पराभव केलेल्या पाटणकरांनी निकाल लागताच दिली ‘हि’ प्रतिक्रिया; म्हणाले…
शशिकांत शिंदें यांचा पराभव केल्यानंतर रांजणे यांचे हॅलो महाराष्ट्रला पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
रामराजे नाईक- निंबाळकर हे सातारा जिल्ह्याला लागलेला कॅन्सर
राष्ट्रवादी कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी सहकार मंत्र्यांनी दिली हि प्रतिक्रिया | Balasaheb Patil
कोण जिंकलं? कोण हरलं? जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सर्व निकाल पहा मतमोजणी केंद्रावरून | निकालाचे विश्लेषण