निवडणुकीत हार जीत ही होतच असते; पराभवानंतर उदयसिंह पाटील उंडाळकरांनी मानले आभार

सातारा । सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. कराड दक्षिण मतदार संघाच्या दृष्टीने व जिल्ह्याच्या दृष्टीने मानल्या जाणाऱ्या या निवडणुकीत कराड सोसायटी गटातून सहकार मंत्री बाळासाहेब पाटील विजयी झाले. तर माजीमंत्री विलासकाका उंडाळकर यांचे काँग्रेसवासी पुत्र उदयसिंह पाटील उंडाळकर यांचा पराभव झाला. पराभवानंतर त्यांनी जनतेचे आभार मानले आहेत. “निवडणुक म्हटलं की जय पराजय ठरलेला असतो. मात्र, अत्यंत अटीतटीच्या व चुरशीच्या लढतीत आपण मतदारांनी व कार्यकर्त्यांनी दिलेली साथ अत्यंत मोलाची आहे, असे पाटील यांनी म्हंटले आहे.

कराड सोसायटी गटातून सहकार मंत्री पाटील यांच्याकडून पराभव झाल्यानंतर उदयसिंह उंडाळकर यांनी जनतेचे आभार मानले आहे. त्यांनी आभारात म्हंटले आहे की, मी कराड सोसायटी मतदार संघातून निवडणूक लढवली. महत्वाच्या असलेल्या या निवडणुकीत कराड तालुक्यातील सर्व मतदार व कार्यकर्त्यांनी अहोरात्र कष्ट घेऊन पाठिंबा दिला. निवडणुक म्हटलं की जय पराजय ठरलेला असतो. मात्र, अत्यंत अटीतटीच्या व चुरशीच्या लढतीत आपण मतदारांनी व कार्यकर्त्यांनी दिलेली साथ अत्यंत मोलाची आहे. याबद्दल कराड सोसायटी गटातील सर्व मतदारांचे व अहोरात्र कष्ट घेणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतो.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. दरम्यान कराड सोसायटी गटातून उभे राहिलेल्या सहकार मंत्री बाळासाहेब पाटील व उदयसिंह पाटील यांच्या मतांचीही मोजणी करण्यात आली. यावेळी निवडणुकीत उदयसिंह पाटील उंडाळकर यांना 66 मते पडली. तर बाळासाहेब पाटील यांना 74 इतकी मते पडली. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचा अवघ्या 8 मतांनी विजय झाला आहे.

हे पण वाचा –

शशिकांत शिंदेंचा पराभव कार्यकर्त्यांच्या जिव्हारी ; राष्ट्रवादी कार्यालय फोडले (Video)

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा 7 मतांनी पराभव; पाटणकरांनी मारली बाजी

राष्ट्रवादी आमदार शशिकांत शिंदेंचा अवघ्या 1 मताने पराभव; जावळीतून ज्ञानदेव रांजणे विजयी

भाजप -राष्ट्रवादीची गठ्ठी, उंडाळकरांची इठ्ठी : सहकार मंत्री बाळासाहेब पाटील विजयी

तुरुंगातून निवडणूक लढवून प्रभाकर घार्गेंनी मारली बाजी : राष्ट्रवादीला धक्का

शेखर गोरे यांना धक्का; तब्बल 1080 मतांनी दारुण पराभव

रामराजे निंबाळकर हे सातारा जिल्ह्याला लागलेला कॅन्सर; शेखर गोरेंची जहरी टीका

आ. शशिकांत शिंदे यांच्या पराभवावर चंद्रकांत पाटलांनी दिली ‘हि’ प्रतिक्रिया; म्हणाले…

निवडणुकीत हार जीत ही होतच असते; पराभवानंतर उदयसिंह पाटील उंडाळकरांनी मानले आभार

पराभवानंतर आ. शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..

सहकार पॅनलमधून ऋतुजा पाटील, कांचन साळुंखे विजयी

 

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक निकाल सर्व अपडेट एका बुलेटिनमध्ये

सातार्‍यात राडा : शशिकांत शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचं कार्यालय फोडलं

सहकारमंत्र्यांची विजयानंतर हॅलो महाराष्ट्र सोबत बातचीत; काय म्हणाले पहा

गृहराज्यमंत्रांचा पराभव केलेल्या पाटणकरांनी निकाल लागताच दिली ‘हि’ प्रतिक्रिया; म्हणाले…

शशिकांत शिंदें यांचा पराभव केल्यानंतर रांजणे यांचे हॅलो महाराष्ट्रला पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

रामराजे नाईक- निंबाळकर हे सातारा जिल्ह्याला लागलेला कॅन्सर

राष्ट्रवादी कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी सहकार मंत्र्यांनी दिली हि प्रतिक्रिया | Balasaheb Patil

कोण जिंकलं? कोण हरलं? जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सर्व निकाल पहा मतमोजणी केंद्रावरून | निकालाचे विश्लेषण

 

You might also like