Thursday, March 30, 2023

आता कमी होणार EPFO वरील व्याज दर, 4 मार्च रोजी घेतला जाणार याबाबतचा निर्णय

- Advertisement -

नवी दिल्ली । कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) मार्च 2021 च्या पहिल्या आठवड्यात 2020-21 आर्थिक वर्षाच्या ईपीएफ व्याज दरांची घोषणा करू शकते. ईपीएफओने 4 मार्च 2021 रोजी श्रीनगर येथे होणाऱ्या बैठकीबद्दल केंद्रीय विश्वस्त मंडळाला (CBT) एक पत्र पाठविले आहे. या बैठकीत ईपीएफओची मिळकत आणि आर्थिक परिस्थिती (Earning and Financial Situation) तपासली जाईल. त्याच बैठकीत 2020-21 या आर्थिक वर्षाच्या व्याजदराच्या घोषणेच्या प्रस्तावासही निर्णय होण्याची शक्यता आहे.

भविष्य निर्वाह निधीवरील व्याज दर का कमी केला जाऊ शकतो
ईपीएफओचे विश्वस्त केई रघुनाथन म्हणाले की,”त्यांना 4 मार्चला श्रीनगर येथे होणाऱ्या सीबीटीच्या पुढील बैठकीची माहिती मिळाली आहे. या बैठकीचा अजेंडा लवकरच समोर येतो आहे. मात्र, ते म्हणाले की, या बैठकीच्या माहितीशी संबंधित ई-मेलमध्ये व्याज दरावरील चर्चेचा उल्लेख नाही. दरम्यान, अशी शक्यता वर्तविली जात आहे की, ईपीएफओ 2020-21 या आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवरील व्याज दर कमी करू शकेल.” आर्थिक वर्ष 2019-20 साठी भविष्य निर्वाह निधीवरील व्याज दर 8.5 टक्के होता. असे मानले जाते आहे की, कोरोना संकटकाळी पीएफमधून जास्त पैसे काढल्यामुळे आणि कमी कंट्रीब्यूशन झाल्यामुळे व्याज कमी करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

- Advertisement -

2020 मध्ये 7-वर्षाच्या नीचांकावर
मार्च 2020 मध्ये, ईपीएफओने 2019-20 या आर्थिक वर्षासाठी भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदर 8.5 टक्के केले. गेल्या सात वर्षातील हा सर्वात कमी व्याज दर आहे. 2012-13 मध्ये यापूर्वी व्याजदर 8.5 टक्के होता. आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये पीएफ ठेवींवर सदस्यांना 8.65 टक्के व्याज मिळाले. ईपीएफओने 2016-17 साठी पीएफ ठेवींवर 8.65 टक्के, सन 2017-18 साठी 8.55 टक्के आणि 2015-16 साठी 8.8 टक्के व्याज दिले. त्याचबरोबर 2013-14 मध्ये पीएफ ठेवींवर 8.75 टक्के व्याज दिले गेले होते, जे 2012-13 या आर्थिक वर्षात 8.5 टक्क्यांपेक्षा जास्त होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.