हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आज ग्राहकांना मोठी भेट दिली आहे. बँकेने अशी माहिती दिली आहे की, आता ते यापुढे ग्राहकांकडून बँकेच्या बचत खात्यावर minimum balance ठेवण्यासाठीचे शुल्क आणि SMS चार्जेज आकारणार नाहीत. त्यांनी हे शुल्क माफ केले आहे.
लाइव्ह मिंटच्या वृत्तानुसार, SBI ने आज ट्विट केले आहे की SBI बचत खातेदारांसाठी ही चांगली बातमी आहे. आता आपल्याकडे SMS सेवा आणि मासिक सरासरी शिल्लक न राखल्यास आपल्याकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. SBI च्या 44 कोटीहून अधिक बचत खातेधारकांना ही सुविधा मिळेल.
ही सुविधा SBI च्या सर्व बचत खात्यांना आहे का ज्यांना इंटरनेट बँकिंग आणि चेक बुकची सुविधा उपलब्ध आहे ? या प्रश्नाच्या उत्तरासाठी SBI ने केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की हे शुल्क सर्व बचत खात्यांना लागू आहे.
या खातेदारांना अनलिमिटेड फ्री एटीएम व्यवहाराचा लाभ मिळतो
SBI त्यांच्या बचत खात्यात अधिक शिल्लक राखणाऱ्यांना मोठ्या संख्येने फ्री एटीएम ट्रान्सझॅक्शन देते. उदाहरणार्थ, खातेधारक जे 1 लाखाहून अधिक रक्कम शिल्लक ठेवतात त्यांना एका महिन्यात अनलिमिटेड फ्री एटीएम ट्रान्सझॅक्शनचा लाभ मिळतो.
मार्चमध्येसुद्धा सरासरी मासिक किमान रक्कम ठेवण्यासाठीची अनिवार्यता बँकेने काढून टाकली
यावर्षी मार्चमध्ये SBI ने जाहीर केले होते की त्यांनी सर्व बचत बँक खात्यांसाठी आवश्यक असलेली किमान मासिक शिल्लक रद्द केली आहे. याद्वारे बँकेच्या सर्व बचत खातेदारांना झिरो बॅलेन्सची सुविधा मिळू शकेल. त्या वेळी मेट्रो शहरांमधील बचत खातेधारकांना किमान रक्कम म्हणून 3000 रुपये, शहरांमध्ये 2000 रुपये आणि ग्रामीण भागात 1000 रुपये ठेवणे आवश्यक होते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.