Sunday, May 28, 2023

SBI देत आहे फ्री मध्ये ITR भरण्याची सुविधा, अशाप्रकारे फाइल करा

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या SBI (State bank of india) ने आपल्या ग्राहकांना एक मोठी भेट दिली आहे. एसबीआयने ग्राहकांना फ्री मध्ये आयटीआर (Income Tax Return) दाखल करण्याची सुविधा दिली आहे. आपण जर एसबीआयचे ग्राहक असाल तर आपण योनो अ‍ॅपच्या सहाय्याने इनकम टॅक्स रिटर्न फ्री मध्ये भरू शकता. आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2020 आहे, तर तुम्ही ताबडतोब आपला रिटर्न दाखल करा अन्यथा तुम्हांला दंड भरावा लागेल.

एसबीआयने ट्विट करुन दिली माहिती
स्टेट बँक ऑफ इंडियाने ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. एसबीआयने ट्विटमध्ये लिहिले आहे की, बचतहीआणि आयटीआर फायलिंगही. YONO वर Tax2win सह आपले इनकम टॅक्स रिटर्न फ्री मध्ये दाखल करा. त्याच वेळी, आपण सीएची सर्विस देखील घेऊ शकता. मात्र, आपल्याला या सर्विससाठी शुल्क भरावे लागेल आणि ते 199 पासून सुरू होईल.

https://twitter.com/TheOfficialSBI/status/1342494177666322439

या नंबरवर कॉल करून आपल्याला मिळू शकते मदत
जर आपल्याला रिटर्न फाईल करण्यात समस्या येत असेल तर आपण +91 9660-99-66-55 वर कॉल करून मदत घेऊ शकता. याशिवाय, आपण support@tax2win.in वर ईमेल देखील करू शकता.

YONO अ‍ॅपद्वारे ITR कसा दाखल करावा
यासाठी, आपण प्रथम योनो ऍपवर लॉग इन केले पाहिजे. यानंतर आपण शॉप अँड ऑर्डरवर जा. मग टॅक्स अँड इन्वेस्टमेंटवर जा. यानंतर, आपल्याला Tax2win दिसेल. येथे आपल्याला सर्व माहिती मिळेल.

आतापर्यंत इतके ITR दाखल केले गेले आहेत
याशिवाय इनकम टॅक्स डिपार्टमेंटने ट्विट केले की, रविवारी रात्री 8 वाजेपर्यंत 6,90,617 ITR दाखल करण्यात आलेले आहेत. त्यापैकी, शेवटच्या एका एसबीआय तासात 60,395 रिटर्न दाखल करण्यात आले. 26 डिसेंबरपर्यंत 2020-21 या वर्षाच्या मूल्यांकन वर्षासाठी 4 कोटी 15 लाख इनकम टॅक्स रिटर्न भरले गेले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.