SBI ने आपल्या कोट्यावधी ग्राहकांना केले सतर्क, जर लक्ष दिले नाही तर होऊ शकते मोठे नुकसान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात बँकिंग फ्रॉडची प्रकरणे वाढत आहेत. फसवणूक करणारे लोक अनेक नवनवीन मार्गांनी लोकांना त्यांच्या फसवणूकीचा बळी बनवत आहेत. अशी फसवणूक टाळण्यासाठी देशातील सर्वात मोठी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI – State Bank of India) सतत लोकांना सावध करत आहे. या क्रमवारीत SBI ने गुरुवारी या फसनवूक करणाऱ्या लोकांच्या नव्या मार्गाविषयीही माहिती दिली आहे. तसेच SBI ने असेही सांगितले आहे की, जर आपण अशा प्रकारे त्यांना बळी पडलय नंतर काय करायला पाहिजे आणि आपल्या कमावलेल्या पैसे या गुंडांनी साफ करू नये म्हणुन आपण काय केले पाहिजे याची माहिती घ्या.

SBI ने आपल्या कोट्यवधी ग्राहकांना सतर्क केले आणि सांगितले आहे की,” फेक ई-मेल आमच्या ग्राहकांना पाठविण्यात येत आहेत. SBI या ईमेलशी संबंधित नाही. अशा परिस्थितीत आपण असे ई-मेल उघडणे टाळावे. SBI ने आपल्या ग्राहकांना असे कोणतेही मेल पाठवले नसल्याचेही सांगितले आहे.

बँकिंग सेवेसाठी अधिकृत पोर्टल वापरा
SBI ने म्हटले आहे की, ‘SBI च्या नावावर असे कोणतेही मेल आल्यास आम्हांला त्वरित कळवा. SBI नेही आपल्या ट्विटमध्ये एक लिंक दिली आहे. ही लिंक राष्ट्रीय सायबर गुन्हे रिपोर्टिंग पोर्टलची (National Cyber Crime Reporting Portal) आहे. या पोर्टलवर फ्रॉडस्टर्सकडून असा ई-मेल प्राप्त झाल्याबद्दल आपण तक्रार नोंदवू शकता. यानंतर, राष्ट्रीय सायबर सेल याबाबतीत आवश्यक ती कारवाई करेल. या ट्विटमध्ये SBI ने आपल्या इंटरनेट बँकिंगला (SBI Internet Banking) लिंकही दिलेली आहे. SBI ऑनलाइन बँकिंग सेवा वापरणारे ग्राहक या पोर्टलद्वारे एसबीआय बँकिंग सेवेचा (SBI Banking Service) लाभ घेऊ शकतात. कोणत्याही बँकिंग सेवेचा लाभ हा केवळ अधिकृत पोर्टलद्वारे घ्या असेही SBI ने यावेळी सांगितले आहे. आपण असे न केल्यास, आपण बँकिंगच्या फसवणूकीचा शिकार होऊ शकता.’

नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल हे केंद्र सरकार द्वारे चालविण्यात येणारे पोर्टल आहे, जिथे आपण सायबर क्राइम संबंधित तक्रारी दाखल करू शकता. या पोर्टलवर महिला आणि मुलांवरील कोणत्याही सायबर गुन्ह्याविरूद्ध तक्रार नोंदविली जाऊ शकते.

या सरकारी पोर्टलवर तक्रार दाखल करण्याचे दोन पर्याय आहेत. पहिल्या पर्यायाखाली मुले किंवा स्त्रिया कोणत्याही सायबर क्राइमविरूद्ध तक्रार देऊ शकतात. दुसर्‍या पर्यायात इतर सर्व प्रकारच्या सायबर क्राइमचा रिपोर्ट दिला जाऊ शकतो. यामध्ये बँकिंग फसवणूकीच्या बाबतीत तुम्हाला दुसरा पर्याय निवडावा लागेल.

सायबर क्राइम पोर्टलवर तक्रार कशी नोंदवायची ?
या दुसर्‍या पर्यायातून तक्रार नोंदवण्यासाठी तुम्हाला तुमचे नाव, लॉगइन आयडी, मोबाइल नंबर आणि ओटीपी टाकावे लागतील. आपण नवीन युझर असाल तर पहिले या पोर्टलवर स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे. नवीन युझर म्हणून नोंदणी करण्यासाठी, आपल्याला आपला मोबाइल नंबर द्यावा लागेल. त्यानंतर आपल्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी पाठविला जाईल. ओटीपी सबमिट केल्यानंतर नोंदणीचे काम पूर्ण होईल. यानंतर, आपण आपली तक्रार नोंदविण्यात सक्षम व्हाल. हे काम अवघ्या काही मिनिटांतच पूर्ण होईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.