हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI : RBI कडून नुकतेच रेपो दरात वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर अनेक बँकांनी आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे. अशा परिस्थितीत आता SBI ने देखील आपल्या ग्राहकांसाठी SBI Annuity Deposit Scheme नावाची एक खास ऑफर आणली आहे. या स्कीममध्ये गुंतवणूकदारांना एकदाच गुंतवणूक करून दर महिन्याला निश्चित रक्कम मिळेल. रिटायरमेंटनंतर किंवा इतर कोणत्याही योजनेतून एकरकमी पैसे मिळवणाऱ्या नागरिकांसाठी ही योजना खूप चांगली आहे.
कोणकोण खाते उघडू शकतो ???
अल्पवयीन व्यक्तीसह कोणत्याही भारतीय नागरिकाला हे खाते उघडता येईल. यामध्ये जॉईंट अकाउंट अथवा सिंगल अकाउंट उघडता येते. बँकेच्या वेबसाइटनुसार NRO किंवा NRI ला यांमध्ये गुंतवणूक करता येणार नाही. तसेच ज्येष्ठ नागरिकांना या योजनेमध्ये जास्त व्याज दिले जाईल.
मात्र हे लक्षात घ्या कि, यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांकडे बचत, चालू किंवा ओव्हरड्राफ्ट खाते असणे जरुरीचे आहे. तसेच, या खात्यांमध्ये इंटरनेट बँकिंगची सुविधा देखील असली पाहिजे. त्याचबरोबर हे खाते कोणत्याही कारणास्तव लॉक किंवा बंद केलेले नसावे.
10 वर्षांपर्यंतची योजना
ही योजना SBI च्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध आहे. तसेच ती 36, 60, 84, 120 महिन्यांच्या कालावधीसाठी उपलब्ध असेल. म्हणजेच, या मध्ये आपल्याला 3 वर्षे ते 10 वर्षांपर्यंतची एन्युइटी निवडता येईल. यामध्ये दरमहा किमान 1,000 रुपयांच्या वार्षिकीनुसार किमान गुंतवणूक मोजली जाते. जी या योजनेमध्ये निवडलेल्या कालावधीवर देखील अवलंबून असते.
ऑनलाइन आणि ऑफलाइन डिपॉझिट्ससाठी वेगवेगळे नियम
या योजनेमध्ये पैसे ऑनलाइन आणि ऑफलाइन डिपॉझिट्स करण्यासाठी वेगवेगळे नियम आहेत. जर एखाद्याला यामध्ये ऑनलाइन ट्रान्सझॅक्शनद्वारे पैसे गुंतवायचे असतील तर ऑनलाइन पैसे पाठवण्यासाठी समान मॅक्सिमम डिपॉझिट लिमिट नेहमीप्रमाणेच राहील. मात्र जर आपण ऑफलाइन मोडद्वारे पैसे जमा केल्यास त्यावर कोणतेही लिमिट नसेल.
FD वरूनच व्याज ठरवले जाईल
SBI च्या या योजनेमध्ये फक्त FD द्वारे व्याज ठरवले जाईल. हे लक्षात घ्या कि, बँकेकडून 14 जून रोजी FD व्याज दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. सध्या बँकेकडून 3 ते 10 वर्षांच्या FD वर 5.50% पर्यंत व्याज दिले जात आहे. तसेच यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना 5.95 टक्के ते 6.30 टक्के व्याज दिले जात आहे. FD प्रमाणे इथेही व्याजावर TDS लागू होईल. मात्र हे टाळण्यासाठी आपल्याला पॅन कार्ड डिटेल्स द्यावे लागतील.
खात्यावर या सुविधा मिळतील
SBI कडून या खात्यावर ओव्हरड्राफ्टची सुविधा देखील दिली जाते. या खात्यामध्ये जमा केलेल्या रकमेपैकी 75% रक्कम ओव्हरड्राफ्ट म्हणून घेतली जाऊ शकते. मात्र ही रक्कम फक्त लग्न, उपचार किंवा शिक्षण यासारख्या गरजांसाठीच काढता येईल. यामध्ये जर एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याच्या खात्यात जमा केलेली 15 लाख रुपयांपर्यंतची रक्कम मुदतपूर्व काढता मात्र येईल. इतर कोणत्याही परिस्थितीत पैसे काढल्यास त्यासाठी दंड आकारला जाईल.
अधिक माहिती साठी या वेबसाईटला भेट द्या : https://sbi.co.in/web/personal-banking/investments-deposits/deposits/annuity-deposit-scheme
हे पण वाचा :
IRCTC खाते आधारशी ऑनलाइन लिंक करण्यासाठीची प्रोसेस समजून घ्या
Gold Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात वाढ, नवीन दर पहा
EPFO: नोकरी बदलल्या नंतर PF ट्रान्सफर करावा हे समजून घ्या
PAN Card ऑनलाइन व्हेरिफाय करण्यासाठी काय करावे ते जाणून घ्या