जर आपले खाते जन धन खात्याशी जोडले गेले असेल तर SBI आपल्याला देईल दोन लाखांपर्यंतच्या ‘या’ विमा पॉलिसीचा लाभ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जर आपले खाते जन धनशी जोडलेले असेल तर आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे. भारतातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) जनधन खातेधारकांना दोन लाख रुपयांपर्यंतचे अपघात विमा संरक्षण (Accident Insurance Cover) जाहीर केले आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एसबीआय रुपे जन धन कार्ड (SBI RuPay Jan Dhan Card) साठी अर्ज करावा लागेल.

SBI ने शुक्रवारी आपल्या अधिकृत ट्विटद्वारे ही माहिती दिली. तसेच स्वत: ला रस्त्यात सुरक्षित ठेवा आणि SBI RuPay Jan Dhan Card साठी अर्ज करा. पंतप्रधान जन-धन याेजना (PMJDY) यामध्ये खातेधारकांना सरासरी मासिक शिल्लक ठेवण्यास सूट देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत ग्रामस्थ आणि शहरवासीयही बँकांमध्ये आपली खाती उघडू शकतात.

केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत लेखी उत्तरात सांगितले की,”प्रधानमंत्री जन धन योजनेंतर्गत एकूण 41.75 कोटी खाती उघडली गेली असून त्यापैकी 35.96 कोटी खाती कार्यरत आहेत.

अशा प्रकारे आपण देखील आपले खाते उघडू शकाल
जर तुम्हालाही पंतप्रधान जन-धन योजनेंतर्गत आपले खाते उघडायचे असेल तर त्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड आवश्यक असेल. जर आधार कार्डमध्ये दिलेला पत्ता बदलला असेल तर त्यासाठी प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल. परंतु जर आपल्याकडे आधार कार्ड नसेल तर आपण वाेटर आयडी कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट किंवा नरेगा कार्ड सारख्या इतर कागदपत्रांसह देखील खाते उघडू शकता. जर आपला सध्याचा पत्ता यापैकी कोणत्याही कागदपत्रांत बदललेला नसेल तर आपल्या पत्त्यासाठी आणि ओळखपत्रासाठी हे पुरेसे आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment