SBI, ICICI आणि HDFC बँकांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी आणली आहे एक खास FD योजना, जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया आणि खाजगी क्षेत्रातील बँक एचडीएफसी आणि आयसीआयसीआय यांनी या कोरोना व्हायरसच्या काळात देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विशेष फिक्स्ड डिपॉझिट योजना सुरु केली आहे. त्याअंतर्गत जर ज्येष्ठ नागरिकांनी या बँकांमध्ये फिक्स्ड डिपॉझिट ठेवली तर त्यांना त्यावर अधिक व्याज दिले जाईल. मात्र, यासाठी बँकांनी काही अटीदेखील ठेवलेल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठीची ही विशेष एफडी योजना 30 सप्टेंबर 2020 पर्यंत लागू आहे

जास्त व्याजाचा लाभ केवळ ज्येष्ठ नागरिकांनाच मिळेल ज्यांनी 5 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी बँकेत एफडी केली आहे. त्याच वेळी, याची दुसरी अट अशी आहे की, याचा फायदा घेण्यासाठी 30 सप्टेंबर 2020 पूर्वी बँकेत एफडी करावी लागेल.

एसबीआय बँकेच्या एफडीसाठी या दराने व्याज आणि इतर सुविधा उपलब्ध असतील
>> स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) आता ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘SBI We-care Deposit’ आणले आहे.
>> एसबीआयने हि योजना ग्राहकांसाठी 12 मे 2020 पासून उपलब्ध करुन दिलेली आहे.
>> 5 वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधी
>> ‘SBI We-care Deposit’ अंतर्गत 0.80 टक्के जास्त दराने व्याज दिले जाईल.
>> ही रक्कम प्री-मॅच्युर विड्रॉल केल्यास त्यांना 0.30 टक्के अतिरिक्त लाभ मिळणार नाही.
>> या विशेष एफडी योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिकाने एफडी केल्यास या एफडीवर लागू असणारा व्याज दर हा 6.20% इतका असेल. हे दर 27 मे पासून लागू आहेत.
>> 0.5% दंड देखील लागू होऊ शकतो.
>> या योजनेत 2 कोटी रुपयांपर्यंतची एफडी करता येईल.

एचडीएफसी बँकेच्या एफडीसाठी या दराने व्याज आणि इतर सुविधा उपलब्ध असतील
>> ज्येष्ठ नागरिकांसाठी एचडीएफसी बँकेच्या या विशेष एफडी योजनेस ”HDFC Senior Citizen Care” म्हणतात.
>> एचडीएफसी बँकेने 18 मे 2020 पासून याची सुरुवात केली आहे.
>> याचा कालावधी 5 वर्ष 1 दिवसापासून 10 वर्षांचा आहे.
>> या विशेष एफडी योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिकाने एफडी केल्यास एफडीला लागू असलेला व्याज दर हा 6.25% इतका असेल. हे दर 12 जूनपासून लागू आहेत.
>> या ”HDFC Senior Citizen Care” अंतर्गत सामान्य एफडीपेक्षा 0.75 टक्के अधिक दराने व्याज दिले जाईल.
>> ही रक्कम प्री-मॅच्युर विड्रॉल केल्यास त्यांना 0.25% नफा मिळणार नाही.
>> 5 वर्षे किंवा त्यापूर्वी पैसे काढल्यास १% दंड आकारला जाईल.
>> 5 वर्षानंतर मुदतीपूर्वी एफडी तोडण्यावर 1.25% दंड
>> एफडी कमाल 2 कोटी पर्यंत मिळू शकेल

आयसीआयसीआय बँकेच्या एफडीसाठी या दराने व्याज व इतर सुविधा उपलब्ध असतील
>> ज्येष्ठ नागरिकांसाठी आयसीआयसीआय बँकेच्या विशेष एफडी योजनेस ‘ICICI Bank Golden Years’ म्हणतात.
>> आयसीआयसीआय बँकेने हो योजना 20 मे 2020 पासून उपलब्ध करुन दिलेली आहे.
>> याचा कालावधी हा 5 वर्ष ते 1 दिवसापासून 10 वर्षांचा आहे.
>> या ”ICICI Bank Golden Years” अंतर्गत सामान्य एफडीकडून 0.80 टक्के अधिक व्याज दिले जाईल.
>> आयसीआयसीआय बँकेमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठीचा वार्षिक व्याज दर 6.55% इतके आहे.
>> 5वर्षे किंवा त्यापूर्वी पैसे काढल्यास 1% दंड आकारला जाईल.
>> 5 वर्षानंतर मुदतीपूर्वी एफडी तोडण्यावर 1.30% दंड
>> एफडी कमाल 2 कोटी पर्यंत मिळू शकेल

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.