Thursday, October 6, 2022

Buy now

कसारा घाटात भीषण अपघात! 40 मिनिटांनी चालकाची सुखरुप सुटका

कसारा : हॅलो महाराष्ट्र – नवीन कसारा घाटात रविवारी सकाळी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एका टेम्पोला भीषण अपघात (Accident) झाला. हा अपघातग्रस्त कंटेनर नाशिकहून मुंबईला जात होता. लतिफवाडीच्या वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कंटेनर रस्त्यावरच पलटी झाला. यामध्ये दैव बलवत्तर म्हणून एवढा भीषण अपघात (Accident) होऊनही चालक आणि क्लिनर दोघेही सुखरुप बचावले आहेत. तब्बल 40 मिनिटांनी कंटेनरमध्ये अडकलेल्या चालकाची सुखरुप सुटका करण्यात आली.

या अपघातात चालकाच्या पायला गंभीर जखम झाली असून क्लिनर किरकोळ जखमी झाला आहे. या अपघाताची (Accident) माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य सुरु केले. रविंद्र सिंग असे चालकाचे तर अमित कुमार शुक्ला असे क्लिनरचे नाव आहे. रविंद्र सिंग आणि अमित कुमार शुक्ला हे दोघे कंटनेर घेऊन नाशिकहून मुंबईकडे सकाळी चालले होते. नवीन कसारा घाटात कंटेनर येताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि लतिफवाडीच्या वळणावर कंटनेर पलटी झाला.

या अपघातानंतर चालक आणि क्लिनर कंटेनरमध्ये अडकले होते. यानंतर कसारा घाट पोलिसांना या अपघाताची (Accident) माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन टीमशी संपर्क साधला आणि त्यांना घटनास्थळी बोलावून घेतले. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापनने शर्तीचे प्रयत्न करून तब्बल 40 मिनिटांनी कंटेनरमध्ये अडकलेल्या चालकाची सुखरुप सुटका केली. या चालकाला उपचारासाठी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हे पण वाचा :

दोन महिलांनी चोरल्या 90 हजारांच्या पैठण्या, चोरीची घटना CCTVमध्ये कैद

मृत पिल्लाला घेऊन हत्तीणीची फरफट, मन हेलावणारा व्हिडिओ आला समोर

कार चालकाच्या एका छोट्याशा चुकीमुळे महामार्गावर भीषण अपघात

नागपुरची कन्या संजना जोशी राष्ट्रकुल स्पर्धेत करणार भारताचे प्रतिनिधित्त्व, कोण आहे संजना जोशी ?

जिथे राष्ट्रवादी स्ट्राॅंग तिथे शिवसेनेवर अन्याय : खा. श्रीकांत शिंदे