संजय राऊतांसाठी शरद पवार मैदानात; मोदींकडे केली तक्रार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काल शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मालमत्तेवर ईडीने कारवाई केली. राऊतांवरील कारवाईबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार आता मैदानात उतरले आहेत. त्यांनी आज दिल्लीत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदेतील पंतप्रधान कार्यालयात जाऊन भेट घेतली. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने केलेली कारवाई अन्यायकारक आहे. संजय राऊतांवर कारवाईची गरज काय होती? असा सवाल करीत पवारांनी मोदींकडे राऊतांवर ईडीने केलेल्या कारवाईची तक्रार केली.

आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी याची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राऊतांवरील ईडीच्या कारवाईबाबत मोदींकडे विचारणा केली असल्याचे सांगितले. यावेळी पवार म्हणाले की, संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. ते राज्यसभा सदस्य आहेत आणि ते एक पत्रकार आहेत, याबाबत मी मोदींना कल्पना दिली आहे.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/997536671168362

मी सांगितलेल्या मुद्यांवर पंतप्रधान मोदी नक्की विचार करतील आणि ते योग्य निर्णयही घेतील अशी अपेक्षा आहे. तसेच राऊतांवरील कारवाईबाबत केंद्रीय तपास यंत्रणा जबाबदार आहे. राऊतांवर अन्याय झाला असून ही कल्पना मोदींना दिली असल्याचेही यावेळी पवार यांनी सांगितले.

Leave a Comment