शिवसेनेचा तानाजी सावंतांना मोठा धक्का ! सोलापूरच्या जिल्हा संपर्क पदावरून केली हकालपट्टी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – शिवसेनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने बंड केल्यामुळे शिवसेनेला मोठ्या प्रमाणात गळती लागली. ती अजूनही सुरूच आहे. त्यातच आता शिवसेनेने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत (tanaji sawant) यांची शिवसेनेच्या सोलापूर जिल्हा संपर्क पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या (tanaji sawant) जागी आता सोलापूर जिल्हा संपर्क पदावर अनिल कोकीळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तानाजी सावंत (tanaji sawant) यांची हकालपट्टी आणि अनिल कोकीळ यांची नियुक्ती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं करण्यात आल्याची माहिती सामनातून देण्यात आली आहे. तानाजी सावंत (tanaji sawant) यांना शिवसेनेचा हा मोठा धक्का मानला जात आहे.

कार्यकर्त्यांची पक्षातून हकालपट्टी
एकनाथ शिंदेंसोबत एक एक करत जवळपास 39 शिवसेना आमदार गेले. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी ज्यांना जायचे त्यांनी आत्ताच जावे, असा इशारा शिवसैनिकांना दिला होता. यानंतर केवळ आमदारच नाही, तर पक्षात विविध जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या कार्यकर्त्यांमध्येदेखील चलबिचल पाहायला मिळाली. त्यानंतर आता एकनाथ शिंदेंना सहकार्य करणारे नेते आणि कार्यकर्ते यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे.

आमदारांनंतर खासदारांची गळती
शिवसेना खासदार संजय जाधवांनी महापुजेला हजेरी लावल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मंदिरात संजय जाधवांचा सत्कार केला. शिवसेनेत आमदारांपाठोपाठ आता खासदारांचही बंड होणार असल्याचे चिन्हे दिसत आहे. त्यामुळे आता शिवसेनेची गळती रोखण्यात उद्धव ठाकरे यशस्वी होतात का ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. यापूर्वी एकनाथ शिंदे यांचे पूत्र श्रीकांत शिंदे, खासदार भावना गवळी हे एकनाथ शिंदेंना जाऊन मिळाले होते.

हे पण वाचा :
“देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाहीत, मला माहिती होतं”, अमृता फडणवीस यांचे मोठे विधान

आमदार शहाजी बापू पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत धरला ठेका, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियाला दुसरा धक्का, ‘या’ चुकीमुळे पाकिस्तानला झाला फायदा

खरे खंडणी बहाद्दर राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे : आ. महेश शिंदे

नांदेडमध्ये खंडणीप्रकरणी काँग्रेस नगरसेवकाच्या मुलाला अटक, तर शिवसेनेचा माजी नगरसेवक फरार

Leave a Comment