पीएम केअर फंडातून दिलेले 60 टक्के व्हेंटिलेटर्स आजही बंद; राऊतांचा केंद्रावर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत देशात सध्या ओमिक्रॉन या नव्या विषाणूवरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राज्य सरकारकडूनही याबाबत खबरदारीच्या उपाययोजना आखल्या जात आहेत. दरम्यान शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी कोरोना दरम्यान पीएम केअर फंडाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या मदतीवरून केंद्र सरकावर निशाणा साधला आहे. “पीएम केअर फंडातून दिलेले 60 टक्के व्हेंटिलेटर्स आजही काम करत नाहीत, असा आरोप विनायक राऊत यांनी करीत यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरोग्यमंत्री मनसूख मांडवीय यांचा दाेष नसल्याचे म्हंटले आहे.

शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी आज संसदेत कोरोनाबाबत माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्रात कोरोना काळात पीएम केअर फंडाच्या माध्यमातून मोठ्या स्वरूपात मदत करण्यात आली. मात्र, त्यात पीएसए प्लांट, व्हेंटिलेटर्स आणि औषधं देण्याची गरज होती. पीएम केअर फंडातून दिलेले 60 टक्के व्हेंटिलेटर्स आजही काम करत नाहीत.

ओमिक्रॉन भारतात येऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्राने देखील कोरोना काळात चांगले काम केले आहे. पंतप्रधानांच्या नेतृत्त्वात स्वदेशी बनावटीची लस तयार करण्यात आली होती. कोरोना काळात राजकारण व्हायला नको होते. मात्र मुंबईत दीड लाख लोकांचा मृत्यू होईल, असे म्हंटले गेले. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राजेश टोपे यांनी राज्यात कोरोना काळात चांगल्या प्रकारे काम केले असल्याचे राऊत यांनी म्हंटले.

You might also like