शरद पवारांना मुख्यमंत्रीपेक्षा युपीएचे अध्यक्षच करायला हवं, म्हणजे… ; शिवसेनेची प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमरावतीमधील छत्रपती शिवाजी महारज प्रेक्षागृहाचे शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर चित्र वेगळे असते, असे मोठे विधान काँग्रेस नेत्या तथा महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केले. त्यांच्या विधानावर आता शिवसेनेकडून प्रतिक्रिया आली असून शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी एक व्हिडीओ जारी केली. यामध्ये नीलम गोऱ्हेयांनी “खरं तर शरद पवार यांना मुख्यमंत्रीपेक्षा यूपीएचे अध्यक्ष करावे.देशाला फायदा होईल,” असे म्हणत टोला लगावला आहे.

नीलम गोरे यांनी त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ ट्विट केला असून त्यांनी त्यातून राष्ट्रवादी काँग्रेस व मंत्री यशोमती ठाकूर यांना टोला लगावला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “आज यशोमती ठाकूर यांनी अमरावतीमध्ये असे विधान केले आहे की, शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर वेगळे चित्र दिसले असते.

शरद पवार यांच्या कार्यक्षमता आणि नेतृत्वाबद्दल कुठली शंकाच नाहीय. मला तर वाटतं त्यांना युपीएचं अध्यक्ष करावं, म्हणजे सगळ्या भारतालाच उपयोग होईल. यशोमतीताई तुम्ही असा प्रस्ताव द्याल का?” असा प्रश्नही गोरे यांनी व्हिडीओच्या माध्यमातून विचारला आहे.

 

यशोमती ठाकूर काय म्हणाल्या?

काल अमरावतीत एका कार्यक्रमप्रसंगी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी खासदार शरद पवार यांच्याबाबत मोठे विधान केले. यावेळी त्यांनी“शरद पवारांसाठी काय आणि किती बोलावं. छोट्या तोंडी मोठा घास घेतेय पण तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असता तर महाराष्ट्राचं चित्र अजून वेगळं असतं. चार वेळा पवार मुख्यमंत्री झाले पण आज काळाची गरज आहे. कोणीही कितीही काहीही तीर मारले तरी महाराष्ट्रातील सरकार स्थीर राहणार ,” असे ठाकूर यांनी म्हंटले.

Leave a Comment