माझी व कुटुंबियांची ED मार्फत चौकशी करा; शिवसेनेच्या ‘या’ महिला आमदाराचे थेट राष्ट्रपतींनाच पत्र

0
55
Shiv Sena Ramnath Kovind
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुसते ईडीच्या या केंद्रीय तपास यंत्रणेचे नाव जरी घेतले तरी अनेकांना घाम फुटतो. कारण गेल्या काही महिन्यांपासून ईडीने आपल्या कारवाईतून भल्या भल्याना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. ईडीच्या धाडीमुळे काही नेत्यांची झोपही उडाली असताना आता शिवसेनेच्या एका आमदाराने थेट राष्ट्र्पतींनाच पत्र लिहून आपली व आपल्या कुटूंबियांची तसेच व्यवसायाची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

शिवसेनेच्या मीरा भाईंदर येथील आमदार गीता जैन यांनी एक ट्विट केले असून त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाच पत्र लिहिले आहे. त्या पत्रातून त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणा मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच चौकशीत आपण दोषी आढळलयास राजकारण सोडणार असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.

गीता जैन यांनी 21 मे रोजी राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्रात म्हंटले आहे की, मी 1984 पासून महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील मीरा भाईंदर येथील एका प्रतिष्ठित अशा मीठालाल जैन कुटूंबाची सून बनून या ठिकाणी आले आहे. माझा आणि माझ्या माहेरी असणाऱ्या कुटुंबियांशी कोणत्याही प्रकारचा आर्थिक संबंध नाही. फक्त आणि फक्त कौटुंबिक नाते आहे. मात्र, माझा व माझ्या कुटुंबियांचा पारंपारिक व्यवसाय आहे. काही लोक व्यवसायावरून कुटुंबियांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे आपली व कुटुंबियांच्या व्यवसायाची केंद्रीय यंत्रणा मार्फत चौकशी करावी, अशी मागणी जैन यांनी केली आहे.

माझे राजकारण हे…

राष्ट्रपतींना दोन पानांच्या लिहलेल्या पत्रात जैन यांनी आपल्या व्यवसायासंबंधित माहिती दिली आहे. त्यांनी पत्रात म्हंटले आहे की, मी बांधकाम व्यावसायिक आहे, तो व्यवसाय किती किचकट आहे हे देखील मला माहित आहे. तरी सुद्धा मी चौकशीचे आवाहन करत आहे. केंद्रीय तपास यंत्रणेच्या चौकशीत दोषी आढळले, तर मी राजकारण सोडेन. आम्ही राजकारण हे समाजसेवेसाठी करत असून माझे राजकारण हे संपूर्ण जनतेला समर्पित आहे, असेही जैन यांनी पत्रात म्हंटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here