मुंबई प्रतिनिधी |लोकसभा निवडणुकीत सेना भाजप युतीने कॉंग्रेस आघाडीचा चांगलाच धुव्वा उडवला असून राज्यात देखील पुन्हा युतीचेच सरकार सत्तेवर येईल असा अंदाज एका मराठी वृत्त वाहिनीने वर्तवला आहे. महाराष्ट्रात महायुती २२६ जागा जिंकेल तर कॉंग्रेस आघाडीला एकत्रित ५६ जागांवर समाधान मानावे लागेल. तर इतर ६ जागी विजयी होतील असा अंदाज या सर्व्हेत वर्तवण्यात आला आहे.
कंडोमच्या वापरा संदर्भात तुम्हाला हि माहिती आहे का?
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपला ४१ जागा मिळाल्या आहेत. त्याचीच पुनरावृत्ती येत्या विधानसभेत बघायला मिळणार आहे. वंचित फॅक्टरमुळे राज्यात पुन्हा काँग्रेसचे नुकसान होणार का? याप्रश्नाकडे सर्वांचे लक्ष लागले या आहे. त्यामुळे येत्या विधान सभा निवडणुकीला कॉंग्रेस आघाडीच्या शिरावर वंचित बहुजन आघाडीची टांगती तलवार असणार आहे.
शिवसेनेचे सर्वच खासदार करोडपती तर सर्वाधिक संपत्ती असणारे पहिले ३ खासदार काँग्रेसचे
या सर्व्हे नुसार मुंबईमध्ये सेना भाजप ३१ जागी विजयी ठरणार आहे. तर कॉंग्रेस आघाडीला ३ जागा मिळणार आहेत. तसेच समाजवादी पार्टी आणि एमआयएम एका जागी विजयी होणार आहे. तर पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा गड म्हणून गणला जातो तेथे देखील महायुतीची सरशी होणार आहे.येथील ७२ पैकी ४९ जागा जिंकून भाजप सेना मोठी आघाडी घेणार आहेत. तर राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस फक्त २३ जागांवर गुंडाळले जाणार आहे.
सर्वात वेगवान आणि मोफत बातम्या मिळवण्यासाठी आजच आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा. तसेच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा
whatsapp ग्रुपची लिंक – http://bit.ly/2H9mIl1
फेसबुक पेजची लिंक – http://bit.ly/2YmZejl
महत्वाच्या बातम्या
माढ्याच्या नवनिर्वाचित खासदारांनी धरले विजयसिंहांचे पाय
स्वाभिमानीकडून निवडणूक लढल्यानेच पराभवाचा सामना करावा लागला : विशाल पाटील