हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पूजा चव्हाण प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संपूर्ण सत्य जाणून घेऊन योग्य तो निर्णय घेतील, अस वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मिस्टर सत्यवादी आहेत. ते न्यायप्रिय नेते आहेत.असेही राऊत म्हणाले. ते शनिवारी मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी त्यांनी संजय राठोड यांच्या राजीनाम्याशिवाय अर्थसंकल्पीय अधिवेशन होऊच देणार नाही, या विरोधकांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले. विरोधकांना विरोध करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र, अधिवेशन होऊनच द्यायचं नाही, ही आडमुठी भूमिका लोकशाहीच्या विरोधात असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले
दरम्यान, भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांचे पती किशोर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याविषयी संजय राऊत यांना विचारणा करण्यात आली. त्यावर राऊत यांनी फार बोलण्यास नकार दिला. हे प्रकरण सरकारी स्तरावरील आहे. मला या विषयाची पूर्ण माहिती नाही. त्यामुळे यावर बोलणे योग्य नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले.’
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’