सनी भाई..अशक्य असे काहीच नाही; शोएब अख्तरचा सुनील गावस्करांवर पलटवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लाहोर । कोरोनाव्हायरसने पाकिस्तानात धुमाकूळ घातला आहे. पाकिस्तानात आत्तापर्यंत ६ हजारहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. नुकतेच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आम्हाला वाचावा असं म्हणत जगासमोर हात पसरले होते. करोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामने आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. या प्रस्तावावर भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांच्यानंतर गावस्कर यांनी कडाडून टीका केली होती. एकवेळ तुमच्या लाहोरमध्ये बर्फ पडेल, पण भारत आणि पाकिस्तान मालिका होऊ शकत नाही, असे स्पष्ट मत गावस्कर यांनी मांडले होते. गावस्कर यांच्या या वक्तव्यावर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने पलटवार केला आहे.

रमीझ राजा यांनी आपल्या युट्यूब चॅनेलवर सुनील गावस्कर यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये रमीझ यांनी गावस्कर यांना भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विदेशीय मालिकेबद्दलही विचारले होते. यावर गावस्कर म्हणाले की, ” सध्याच्या घडीला तरी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये क्रिकेट मालिका होऊ शकते, असे मला तरी वाटत नाही. ही गोष्ट जवळपास अशक्य आहे. पण आयसीसीची एखादी स्पर्धा असेल तर त्यामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना होऊ शकतो. पण भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विदेशीय मालिका सध्या तरी शक्य नाही. “यावर शोएबने पलटवार केला आहे. शोएब म्हणाला की, ” सनी भाई, गेल्यावर्षी लाहोरमध्ये बर्फ पडला होता. त्यामुळे अशक्य असे काहीच नाही.”

करोना व्हायरसच्या लढ्यात जी आर्थिक मदत लागेल ती भारत पाकिस्तान सामन्यातून जमा करता येईल, असा प्रस्ताव अख्तरचा होता. हा प्रस्ताव कपिल देव आणि राजीव शुक्ला यांनी फेटाळून लावला होता. अख्तरच्या प्रस्तावाचे समर्थन करताना आफ्रिदीने कपिल देव यांच्या प्रतिक्रियेमुळे निराश झाल्याचे म्हटले.”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

इतर महत्वाच्या बातम्या –

SBI ने ४० करोड ग्राहकांना केले अलर्ट, ‘या’ फेक वेबसाईट पासून रहा सावधान

लॉकडाउन संदर्भात केंद्राची नवी नियमावली, जाणून घ्या काय सुरु राहणार अन काय बंद

काय आहे वटवाघूळ अन् कोरोनाचं कनेक्शन? ICMR चा हा रिपोर्ट वाचून बसेल धक्का

लाॅकडाउन वाढल्याने ६ महिने वाढू शकते EMI मधील सूट, घ्या जाणुन

आता ८ एवजी १२ तासांची होणार कामाची शिफ्ट? कायद्यात होणार सुधारणा

Leave a Comment