Sunday, April 2, 2023

धक्कादायक ! ३ महिन्यात एकाच नववधूने केली तब्बल ९ लग्ने

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात काही महिन्यांपूर्वी कोरोनामुळे सगळीकडे लॉकडाउन झाले होते. देशातील अनेका नवीन जोडप्यांची अगदी साध्या पद्धतीने आपले विवाह पार पाडले आहेत. भोपाळ सुद्धा अनेकांनी आपली लग्न साध्या पद्धतीनेच उरकण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एकाच नववधुने जवळपास लॉक डाउन च्या कळत तब्बल ९ लग्न केली आहेत. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांमध्येही हाहाकार पसरला.

लॉक डाउन च्या काळानंतर पोलीस स्टेशन मध्ये एक तक्रार दाखल झाली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी आठ लोकांना ताब्यात घेतले. त्यातून असे समजले कि गेल्या काही महिन्यांपासून हि टोळी विवाह लावायचे काम करत आहे. पण ज्या घरात हि नववधू जात होती त्या घरात ती १० दिवसांपेक्षा जास्त काळ थांबत नव्हती. काहींना काही निमित्ताने त्या घरातून सर्व दागदागिने घेऊन पसार होत होत्या. अनेकांनी आपली इज्जत जाईल म्हणून तक्रारी दाखल केल्या नव्हत्या. पण मागच्या शनिवारी आलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली असता हा धक्कादायक खुलासा झाला.

- Advertisement -

या टोळीसाठी तीन महिला काम करत होत्या. त्या एकामागे एक अश्या वेगवेगळ्या वेळी लग्न करत होत्या आणि टोळीच्या मालकाने सांगितल्याप्रमाणे त्या पसार व्हायच्या. भोपाळ मध्ये अश्या चार तक्रारी आल्या होत्या. नववधू माहेरी गेल्यानंतर त्याच्या कुटुंबियांशी संपर्क होत नाही. लॉक डाउन च्या काळात लग्नाच्या नावाखाली हि टोळी लोकांना लुटायचे काम करत होती. पहिली तक्रार प्रसाद नावाच्या व्यक्तीने केली होती. त्यानंतर रिया उर्फ प्रिया असे त्या मुलीचे नाव होते. त्यांना पकडण्यासाठी टोळी गेली असता. तिचा नवीन नवरा मिश्रा यांनी विरोध केला आणि तिला अटक करू दिली नाही. जामिन्यावर सोडवण्याची तयारी दाखवली परंतु त्याला जेव्हा हे तिघे पण तिचेच पती आहे जेव्हा कळले मात्र त्यानेही तक्रार दाखल केली. पोलिसांनी टोळीचा प्रमुख दिनेश पांडे, तेजूलाल , वीरेंद्र सिह, सलमान खान, विक्रम , पूजा, रिया,सीमा उर्फ सुलताना याना ताब्यात घेतले आहे. चार तक्रारी दाखल झाल्या आहात. अजून पाच तक्रारी दाखल व्हायच्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.