सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
टेम्पोच्या पुढील भागातील काचेवर औषधे आणि अत्यावश्यक सेवेचा कागद चिकटवून कर्नाटकातून क-हाडला जात असलेला तब्बल ८ लाखाचा गुटखा आटपाडी पोलिसांनी पकडला. उंबरगाव येथे तपासणी नाक्यावर बुधवारी रात्री पोलिसांनी ही कारवाई केली. चालक ध्रुपचंद प्रेमचंद पांडे याला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई पोलिस निरिक्षक बजरंग कांबळे यांच्यासह उपनिरिक्षक अजित पाटील, प्रकाश कांबळे, सहाय्यक निरिक्षक सुधीर पाटील, हवालदार नंदकुमार पवार यांनी केली.
याबाबतची माहिती सांगलीच्या अन्न व औषध विभागास देण्यात आली असून फिर्याद घेण्यासाठी दोन दिवस अन्न व औषध प्रशासनाकडे संपर्क सुरू होता. परतू या कार्यालयातून आटपाडी पोलिसांना कोणाताच प्रतिसाद मिळाला नाही. उलट आम्ही फिर्याद दयायची असेल तर आम्हाला येण्या जाण्यासाठी मोटारीची सोय करा असे सांगण्यात आले त्यामुळे शुक्रवारी पोलिसांनी तपास केला पण गुन्हा दाखल होऊ शकला नाही. लॉकडाऊनच्या पार्श्र्वभूमिवर सांगली आणि सोलापूर जिल्हृयाच्या हद्दीवर उंबरगाव येथे आटपाडी पोलिसांचा तपासणी नाका आहे. सोलापूर सध्या कोरानाबाबतत रेड झोनमध्ये असल्याने जिल्हा बदीची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे.
सोलापूर जिल्हयातून औषधे असे लिहिलेला कागद काचेवर चिकटवून टेप्मो हा उंबरगाव चेक नाक्यावर आला. हा टेम्पो तपासणीसाठी पोलिसांनी थांबविला. काचेवर औषधे अत्यावश्यक सेवा असे लिहीलेले कागद चिकटविलेले दिसत होते. परंतू त्यावर वाहतुकीचा परवाना देणा-या कोणत्याही अधिकाऱ्याची सही अथवा शिक्का नव्हता. यावरून शंका आल्याने पोलिसांनी टेम्पेातील मालाची पाहणी केली. तेव्हा टेम्पोच्या हौदयामध्ये भुसा भरलेली पेालि आढळून आली. या भुसा पोत्यामागे गुटख्याने भरलेली तब्बल ३१ पोति टेम्पोमध्ये मिळाली. त्यानंतर टेम्पो आटपाडी पोलिस ठाण्याच्या आवारात आणण्यात आला. गुटख्याची पोती टेम्पोतून खाली उतरून पोलिस ठाण्यासमोर ठेवण्यात आली आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.