धक्कादायक ! कोरोना लस घेतलेल्या जिल्हा आरोग्य अधिकार्‍यालाच कोरोनाची लागण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड प्रतिनिधी | शेख अनवर

अठरा दिवसापूर्वी कोरोना लस घेतल्यानंतरही बीडचे जिल्हा आरोग्य अधिकारी आर.बी.पवार यांचा कोरोना अहवाल सोमवारी रात्री पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य क्षेत्रासह सर्वत्र खळबळ उडाली आहे. कोरोनाच्या बहारात डॉ.पवारांनी मोठे काम केले. त्या कार्यकाळात त्यांना कोरोनाची लागण झाली नाही मात्र लस घेतल्यानंतर आठरा दिवसांनी ते कोरोना पॉझिटिव्ह आल्याने लसीबाबत प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.

गेल्या 20 दिवसापासून राज्यात कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणावर वाढतांना दिसून येत आहेत. त्यानुषंगाने राज्य शासनासह प्रशासन व आरोग्य विभाग पुन्हा एकदा सतर्क झाला आहे. कोरोना रोखण्यासाठी सर्वस्तरातून प्रयत्न होत असून कोरोना बाबतची लसीकरण मोहिमही राज्यभरात सुरू आहे. बीडमध्ये सर्व प्रथम आरोग्य विभागातील डॉक्टर, कर्मचार्‍यांना कोरोना लसीचा लाभ मिळाला. गेल्या आठरा दिवसापूर्वी म्हणजे 12 फेब्रुवारी रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी. पवार यांनी कोरोनाची लस घेतली. मात्र ही लस घेतल्यानंतरही सोमवारी त्यांना थोडा त्रास जाणवू लागल्याने त्यांनी अँटीजेन टेस्ट केली असता रात्री उशिरा त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.

दरम्यान, लस घेतल्यानंतरही कोरोना पॉझिटिव्ह होते हे पुन्हा एकदा समोर आले असून जिल्हा आरोग्य अधिकार्‍यालाच लस घेतल्यानंतर कोरोना झाल्याचे बीडमध्ये सगळीकळे अफवा युक्त चर्चा पसरत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.