सोनिया गांधींची उद्धव ठाकरेंसोबत चर्चा; नेमकं कारण काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात महाविकास आघाडी सरकारची सत्ता आहे. सरकार सत्तेमध्ये येऊन अडीच वर्षे झाली आहेत. सरकार पडण्याच्या तारखा भाजप नेत्यांकडून सध्या वारंवार देण्यात येत आहे. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी देखील 10 मार्चनंतर राज्य सरकारमध्ये मोठे बदल बघायला मिळणार आहेत, असे सांगितल्याने अनेक प्रकारच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. तर दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून भाजप नेत्यांवर अनेक गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत. अशात आता काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आज फोनवरून चर्चा केली. त्यामुळे राजकीय चर्चेत उधाण आले आहे.

मुंबईत नुकतीच काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्याशी बैठक घेत अनेक विषयावर चर्चा केली. या महत्वाच्या बैठकीनंतर आज काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला. यावेळी आज दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.

दरम्यान काल, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना खासदार संजय राऊत यांना पाठींबाही दर्शविला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जी मोहीम सुरु केलेली आहे त्याला काँग्रेसचा पाठींबा आहे. राऊतांनी भ्रष्टाचारासंदर्भात भाजप नेत्यावर केलेले आरोप आहेत त्याची चौकशी करावी, अशी मागणी वरीष्ठ नेत्यांकडे करणार असल्याचे पटोले यांनी काल सांगितले. दरम्यान आज काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला असल्याने दोघांच्यातील चर्चेमुळे अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत.

Leave a Comment