केवळ 1.80 लाख रुपयांमध्ये सुरू करा भरपूर पैसे मिळून देणारा ‘हा’ व्यवसाय, सरकार देखील करेल मदत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । आपण जर बिझनेस करण्याची योजना आखत असाल तर आपण ट्राउट फिश फार्मिंगचा विचार करू शकता. कारण कोरोना कालावधीत बर्ड फ्लूच्या वृत्तामुळे बाजारात माशांची मागणी झपाट्याने वाढली आहे. याशिवाय मासे खाण्याचे अनेक आरोग्यविषयक फायद्यांमुळे, बाजारात याला नेहमीच मागणी असते. या व्यवसायाचे वैशिष्ट्य म्हणजे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी नाबार्ड 20 टक्के अनुदान देखील देते. नाबार्डच्या म्हणण्यानुसार ट्राउट फार्मिंग अवघ्या 2.3 लाख रुपयात सुरू केले जाऊ शकते. जर तुम्हाला अनुदान मिळालं तर आपल्याला फक्त 1.8 लाख रुपये गुंतवावे लागतील. चला तर मग त्याबद्दल सर्व काही जाणून घेऊयात …

मत्स्यपालनामध्ये अफाट क्षमता आहे
देशात मत्स्यव्यवसायात अपार संभाव्यता आहे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न पाच पटीने वाढू शकते. मत्स्यव्यवसाय क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकारने दोन विधेयके तयार केली होती. या विधेयकांमध्ये राष्ट्रीय सागरी मत्स्य पालन नियमन व व्यवस्थापन विधेयक समाविष्ट आहे.

देशातील 11 लाख हेक्टर बॅक वॉटरमध्ये मत्स्यपालनासाठी अनेक संभावना आहेत. देशांत ज्याठिकाणी खारे पाणी आहे अशा राज्यात आता कोळंबीची लागवड करता येईल. 19509 किमी लांबीच्या नद्यांमध्ये मत्स्यपालन करण्याची योजना आहे. देशात तब्बल 25 लाख हेक्टर क्षेत्रामध्ये पाणवठे, तलाव आणि जलाशय आहेत. यापैकी हेक्टरी उत्पादन केवळ तीन टन आहे आणि त्यात वाढ होणे अपेक्षित आहे.

ट्राउट फार्मिंग म्हणजे काय ते जाणून घ्या
नाबार्डच्या अहवालानुसार ट्राउट हा एक प्रकारचा मासा आहे जो स्वच्छ पाण्यात आढळतो. भारतातील काही राज्यात हा मासा मोठ्या संख्येने आढळतो. त्यापैकी हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, तामिळनाडू, केरळ हे आहेत. या राज्यांमध्ये ट्राउट उत्पादनासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. ट्राउट फिश फार्मिंगला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार अनेक प्रोत्साहनपर कार्यक्रमही चालविते.

यासाठीच खर्च किती असेल?
नाबार्डच्या अहवालानुसार 15X2X1.5 मीटर रेसवे तयार करण्यासाठी सुमारे एक लाख रुपये खर्च येणार आहे, तर इक्‍विपमेंट्स सुमारे 6 हजार रुपयांत मिळतील, ज्यामध्ये हँड नेट, बादली, टब, थर्माकोल बॉक्सचा समावेश असेल. तर 22,500 रुपये सीड आणि 1.45 लाख रुपये फीडवर खर्च केले जातील.

जर आपण कर्ज घेतले असेल तर पहिल्या वर्षाचे व्याज 26,700 रुपये असेल. अशा प्रकारे पहिल्या वर्षामध्ये तुम्हाला एकूण 3 लाख रुपये गुंतवावे लागतील. ज्यावर तुम्हाला 20 टक्के म्हणजेच सुमारे 60 हजार रुपयांचे अनुदान मिळेल. जर तुम्ही एससी किंवा एसटी प्रवर्गातील असाल तर तुम्हाला 25 टक्के सबसिडी देखील मिळेल.

आपण कशाप्रकारे कमाई कराल?
अहवालात म्हटले गेले आहे की, पहिल्या वर्षात तुमची विक्री सुमारे 3.23 लाख रुपये होईल, परंतु पुढच्या वर्षीपासून तुमची भांडवली किंमत कमी होईल आणि तुमची विक्री 3.50 लाख रुपये होईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment