हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सार्वजनिक क्षेत्रातील भारतीय स्टेट बँक आणि खासगी क्षेत्रातील ICICI Bank यांनी आपल्या ग्राहकांना Form-16A डाउनलोड करण्याची सुविधा दिली आहे. जर कोणत्याही ग्राहकांना त्यांचे Form-16A डाउनलोड करण्यास काही समस्या येत असतील तर ते बँक शाखेशी संपर्क साधू शकतात. जर ग्राहकाला मिळालेल्या व्याजातून आर्थिक वर्ष 2019-20 साठी कर वजा केला असेल तर त्यांना Form-16A आवश्यक असेल. Form-16A हे एक TDS Certificate आहे, ज्यात कोणत्याही एका आर्थिक वर्षात मिळविलेल्या व्याज आणि त्यावरील देय करांची माहिती असते. आज आम्ही तुम्हाला या दोन्ही बँकांच्या ग्राहकांसाठी नेट बँकिंगद्वारे Form-16A डाउनलोड करण्याविषयी माहिती देत आहोत.
आपण SBI शाखेत जाऊन नेट बँकिंग सुविधेचा लाभ घेण्यास असमर्थ असल्यास आपण आपला Form-16A घरातूनच डाउनलोड करू शकता. चला तर मग त्याची प्रक्रिया काय आहे ते जाणून घेऊयात.
1. सर्वप्रथम आपण एसबीआय नेट बँकिंग पोर्टलवर लॉग इन करावे.
2. त्यानंतर, पुढच्या स्टेपमध्ये ‘Fixed Deposite’ या टॅबवर जा आणि ‘TDS enquiry’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
3. त्यानंतर एक नवीन वेबपेज उघडेल ज्यामध्ये आपल्याला 3 पर्याय मिळतील. पहिला पर्याय ‘TDS Financial Year’, असेल, तर दुसरा पर्याय ‘NRO TDS Enquiry’ आणि तिसरा पर्याय ‘डाउनलोड’ असेल.
4. TDS Financial Year या पर्यायावर गेल्यानंतर तुमची फिक्स्ड डिपॉझिट अद्याप चालू असल्यास ‘Live Accounts’ निवडावे लागेल. आर्थिक वर्ष 201-20 मध्ये एफडी मॅच्युर झाल्यावर ‘Closed Accounts’ निवडावी लागतात.
5. यातील संबंधित पर्याय निवडल्यानंतर तुमच्या फिक्स्ड डिपॉझिटचे डिटेल्स तुमच्या वेबपेजवर दाखविला जाईल. यामध्ये, आपण ड्रॉप डाऊन मध्ये जा आणि आर्थिक वर्ष निवडा आणि नंतर ‘सबमिट करा’ बटणावर क्लिक करा.
6. एकदा आपण हे सबमिट केल्यास आपला रिक्वेस्ट रेफरेंस नंबर सापडेल आणि आपली टीडीएस इनक्वायरी जेनरेट होईल. यानंतर, आपण ‘डाउनलोड’ या टॅबवर जाऊन टीडीएस डिटेल्स डाउनलोड करू शकता.
आयसीआयसीआय बँकेसाठी ही प्रक्रिया काय आहे ते जाणून घेऊयात-
1. सर्व प्रथम icicibank च्या नेट बँकिंग पोर्टलवर (www.icicibank.com) लॉग इन करावे लागेल.
2. लॉगिन नंतर, ‘Payment & Transfer’ या टॅबवर जा आणि ‘Tax Center’ वर क्लिक करा.
3. त्यानंतर एक नवीन वेबपेज उघडेल. यात बरेच पर्याय असतील. यामधून तुम्हाला ‘TDS Certificate च्या ‘View’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
4. तुमच्या PAN चा एक भाग दिसेल. ड्रॉप डाऊन मेन्यूमधून, आपण एसेसमेंट ईयर सेलेक्ट निवडा. तिमाही आधारावर पर्याय असतील. ज्या तिमाहीत आपला कर वजा केला जाईल, त्याच तिमाहीत निवड करावी लागेल.
5. यानंतर तुम्हाला ‘Generate PDF’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल. जर कर कमी केला असेल तर आपल्या स्क्रीनवर एक स्टेटमेंट येईल. आपल्याला ते सेव्ह करावे लागेल.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in