हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना ची दिसून येते आहे. अनेक जिल्यांमध्ये प्रशासकीय अधिकारी तसेच अनेक स्थानिक सामाजिक कारकर्ते सुद्धा कोरोनाच्या संकटकाळी लोकांची मदत करत आहेत. पण कोरोना मात्र काही संपत नाहीत लोक अक्षरश कंटाळून गेले आहेत.
अमरावती मध्ये राहत असलेल्या आईच्या बाबतीत अशीच घटना घडली तिच्यावर शेवटी मृत्यूनेच वर्चस्व केलं. अमरावती शहरानजीक आर्वी येथील गणपतीवार्ड येथे राहणाऱ्या ६९ वर्षीय सरलादेवी सुदारलाल केला यांची तब्बेत अचानक बदलल्यामुळे त्यांना आर्वी मधील रुग्णालयात दाखल केले. परंतु तेथील डॉक्टरांनी त्यांना अमरावती मध्ये दाखल करण्यास सांगितले. त्यांच्या हृदयात बाधा असल्याने त्याची त्या रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आली. त्यानंतर मात्र त्या रुग्णालयात एक कोरोना बाधित परिचारिका सापडल्याने पुन्हा त्यांना घरी सोडण्यात आले. अमरावती मध्ये त्या मुलाकडे राहू लागल्या पण काही दिवसात त्यांच्या शरीराचे हाड मोडले म्हणून त्यांना पुनः रुग्णालयात दाखल केले हाड जोडण्याचे काम सुरु होते. त्याच दिवशी त्या रुग्णालयात एक चिकित्सक कोरोना बाधित आढळला नंतर त्याच दिवशी त्यांना अमरावती मधील दुसऱ्या रुग्णालयात हलवले. त्यानंतर त्यांची कोरोनाची चाचणी केली त्याची सकारात्मक चाचणी आली त्यामुळे घरातल्या इतर ११ जणांची चाचणी केली सगळ्यांच्या चाचण्या नेगेटिव्ह आल्या फक्त त्याचा मुलगा संदीप याचीच चाचणी पॉसिटीव्ह आली.
संदीपला त्यानंतर विलगीकरण कक्षात ठेऊन उपचार सुरु होते. पण त्याची आई ठीक झाल्या होत्या जवळपास त्यांनी कोरोना वर मत केली होती आणि आज त्यांना घरी सोडणार होते. पण दुसऱ्या चाचणीचा अहवाल येणे बाकी होत म्हणून उशीर केला होता. परंतु त्याची अचानक तब्बेत बिघडली आणि त्याच्यावर कोणताच उपाय काम करू शकत नव्हता अश्यातच त्यांचा दुसरा हि रिपोर्ट पॉसिटीव्ह आला. आणि त्यांना अखेर मृत्यूने कवटाळले इतक्या प्रयत्नांतर त्यांच्यावर अनेक रुग्णालय बदलूनही त्यांचा जीव वाचू शकला नाही त्याची बातमी मुलाला समजताच त्याने जिल्हा रुग्णालयातील कोविद सेंटर मध्ये हंबरडा फोडला फक्तर ५०किलोमीटर वर आई असूनही त्यांना पाहता आले नाही. या गोष्टीमुळे आजूबाजूच्या रुग्णाचे पण डोळे पाणावले. व्हिडीओ वर त्यांनी आईचे अंत्यसंस्कार केले. हे पाहून उपस्थितांची मने हेलावून गेली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.