“भ्रष्टाचार बाहेर काढणाऱ्या फडणवीसांनाच नोटीस पाठवली जाते?”; सुधीर मुनगंटीवारांचा सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पोलीस भरती घोटाळा प्रकरणात नोटीस पाठवण्यात आल्यानंतर रविवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई पोलिसांनी जबाब नोंदवला. त्यावरुन राज्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. याचे पडसाद आजच्या विधानभवनात अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटले. फडणवीसांना पाठवण्यात आलेल्या नोटिसीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सत्ताधाऱ्यांना सवाल केला. “भ्रष्टाचार बाहेर काढणाऱ्या फडणवीसांनाच नोटीस पाठवली जाते. सभागृहातील सदस्यांच्या अधिकारांवर गदा आणली जातेय? असे मुनगंटीवार यांनी म्हंटले.

आज मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आलेल्या नोटीस संदर्भात स्थगन प्रस्ताव भाजप नेत्यांच्या वतीने मांडण्यात आला. यावेळी चर्चेत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आपली भूमिका मांडली. देवेंद्र फडणवीस यांनी महारासहत्रयातील अनेक भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा पर्यंत केला आहे. त्याच्याकडून प्रयत्न केला जात असल्याने त्यांच्यावर कारवाई करत त्यांनाच पोलिसांकडून नोटीस पाठवली जाते? फडणवीस यांना नोटीस पाठवणे म्हणजे सभागृहातील सदस्यांच्या अधिकारांवर गदा आणण्यासारखे आहे, असे मुनगंटीवार यांनी म्हंटले.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/1396133184170479

यावेळी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना नोटीस पाठवून एक प्रकारे त्यांच्यावर आरोप केला जात आहे. त्यांना या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा कसला न्याय आहे. भ्रष्टाचार करणाऱ्यांना शिक्षा की भ्रष्टाचार काढणाऱ्यांना त्रास? असा सवाल मुनगंटीवार यांनी केला. त्यांच्यानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी मुद्दा उपस्थित केला. शेलार यांनी यावेळी पत्रकार परिषदेत फडणवीसांनी फक्त पत्र वाचलं, असे सांगितले.

Leave a Comment