“ठाकरे सरकारने अर्थसंकल्पातून बाळासाहेबांचीही फसवणूक केलीय”; सुधीर मुनगंटीवारांची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याच्या दृष्टीने महत्वाचा असलेला 24 हजार 353 कोटी महसुली तूट असणारा अर्थसंकल्प आज उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला. या अर्थसंकल्पावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी खोचक अशी प्रतिक्रिया दिली. “फसवण्याला एक मर्यादा असते. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने सुरु केलेल्या ‘विकेल ते टिकेल’ बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प सुरु केला. बाळासाहेबांनाही फसवले आहे. आजपर्यंत त्यांच्या नावाने योजना सुरु केली आहे. मात्र, त्यावर एक रुपयाही खर्च करण्यात आला नाही, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली.

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आज मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जुन्याच योजना या सरकारने पुन्हा सुरु केल्या आहेत. या अर्थसंकल्पातून जनतेला फसवण्याचे काम केले आहे. वैश्विक महामारीनंतर आलेला हा अर्थसंकल्प होता. या सार्थकल्पातून अपेक्षा खूप होत्या. मात्र, त्या पूर्ण करण्यात या सरकारला अपयश आलेले आहे. विशेष म्हणजे मागील अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या घोषणाच मुळात पूर्ण करण्यात आलेल्या नाहीत.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/1576418862719711

 

आज महाविकास आघाडी सरकारने जो अर्थसंकल्प मांडला. तो पूर्णपणे फसवा आहे. या अर्थसंकल्पातून खूप अपेक्षाभंग झाला आहे. जेवायला बोलवायचे आणि लोणचे, मीठ ठेऊन जेवण झाल्याचं सांगायचं असा हा प्रकार आहे. अर्थसंकल्पाबाबत सांगायचे झाले तर यातून एकप्रकारे जनतेला फसवण्यात आलेले आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

Leave a Comment