सोलापूरात महिला वकीलेची गळफास घेवून आत्महत्या

0
65
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी | सोलापूर येथील कोर्टात वकिली करत असलेल्या एका महिला वकिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अ‍ॅड.स्मिता धनंजय पवार (वय-३१) असे सदर महिलेचे नाव असून बुधवार दि.१ जुलै रोजी दुपारी २.५० वाजण्यापुर्वी अज्ञात कारणावरून सोलापूर येथील राहते घरात गळफास घेवून आत्महत्या केली. त्यांचे मुळ गाव मंगळवेढा असून त्यांचा २०१८ साली विवाह झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवेढा येथील विठ्ठल गोवे यांची कन्या अ‍ॅड स्मिता हिचा विवाह सोलापूर येथील धनंजय पवार यांचे समवेत ६ मे २०१८ रोजी झाला असून त्या सोलापूर येथील न्यायालयात प्रॅक्टीस करत होत्या. बुधवार दि. १ जुलै रोजी दुपारी पावणेतीन वाजण्यापुर्वी सोलापूरातील जुनी पोलिस लाईन मुरारजी पेठ येथील राहते घरी पहिल्या मजल्याच्या बेडरूममध्ये अज्ञात कारणावरून नारंगी रंगाच्या साडीने छताच्या पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडल्या.

दरम्यान, उपचारासाठी त्यांना सिव्हील हॉस्पीटल सोलापूर येथे दाखल करण्यात आले. परंतू उपचारापुर्वीच त्या मयत झाल्या. त्याची खबर डॉ.अनिकेत मानेकर यांनी पोलिसात दिली असून अधिक तपास हवालदार काझी हे करीत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here