औरंगाबाद प्रतिनिधी | लॉकडाऊनमुळे पुणे येथून औरंगाबादेत घरी आलेल्या प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या 20 वर्षीय विद्यार्थाने घरातील हॉल मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पुंडलीकनगर मधील गजानन कॉलोनी भागात घडली. आत्महत्येचे कारण मात्र समोर आलेले नाही पोलीस पुढील तपास करीत आहेत. विवेक भाऊलाल पांणकडे असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, विवेक हा पुणे येथे कला शाखेत प्रथम वर्षांचा शिक्षण घेत होता.लॉकडाऊनमुळे ते सुमारे तीन आठवड्यापूर्वी घरी आला होता.शुक्रवारी संध्याकाळी आई बेडरूममध्ये साफसफाई करीत होती. त्यावेळी विवेक ने घरातील हॉलचे दरवाजे आतून बंद करून घेतले.तो अभ्यास करीत असावा किंवा टीव्ही बघत असावा असे वाटल्याने आई कामात गुंतली मात्र बराच वेळ झाल्यानंतर देखील विवेक दरवाजा उघडत नसल्याने आईने त्यास हाक दिली मात्र हॉल मधून काही एक प्रत्युत्तर येत नसल्याने आई घाबरली शेजारीच्या मदतीने दरवाजा उघडला असता विवेक ने छताला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची समोर आले. त्यास फसावरून खाली उतरवत घाटी रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी विवेकला तपासून मयत घोषित केले.
त्याने आत्महत्या का केली याचे नेमके कारण समोर आलेलं नाही. मात्र त्याला पबजी गेम खेळायची सवय होती. त्यामुळे आत्महत्या केली असावी अशी चर्चा परिसरात होती. मात्र पोलिसांनी या चर्चेला नकार देत पूर्णविराम दिला. या प्रकरणी पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवलंदार हिंगे करीत आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.