राष्ट्रपती निवडणुकीनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार बरखास्त होणार

Mahavikas Aaghadi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभा निवडणुकीनंतर आता विधानपरिषद निवडणुकीमुले राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मात्र, राष्ट्रपती पदाची निवडणुकही पार पडणार आहे. या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सध्या सत्तेवर असणारे महाविकास आघाडीचे सरकार बरखास्त होईल, असे मोठे विधान भाजपच्या एका आमदाराने केले आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यापासून भाजप नेत्यांकडून अनेक दावे केले जात आहेत. अनेकवेळा उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा ;लागणार, महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार अशी भविष्यवाणी देखील करण्यात आली आहे. आता भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी एक दावा करत मोठे विधान केले आहे. “येणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडी पुर्णपणे बरखास्त होईल. मुख्यमंत्री पदासाठी दगाबाजी करणाऱ्या उद्धव ठाकरेंना राज्यसभा निवडणुकीने चांगला धडा मिळाला असल्याचेही हाळवणकर यांनी म्हंटले.

भाजपच्या कार्यकाळाला 8 वर्ष पूर्ण झाल्याने कोल्हापूरचे माजी आमदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी सांगली येथे कार्यकर्त्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास अगदी सरकारच्या कोसळण्याबाबतचा दावा केला. त्यांच्या दाव्यानंतर आता आघाडी सरकारमधील नेत्यांकडून काय उत्तर दिली जाणारा हे पहावं लागणार आहे.