मुंबई । सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय सुनावला. त्यांनतर भाजप नेत्यांकडून आनंद व्यक्त करण्यात आला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी भाजपा नेत्यांवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र पोलिसांचं नाव देशात कमी केल्याच्या ‘उदात्त’ कार्याबद्दल भाजप नेत्यांना ‘साष्टांग दंडवत’ असं म्हणतं रोहित पवार यांनी ट्विट करून टीका केली आहे.
“सुशांत सिंह प्रकरणात मुंबई पोलिसांच्या तपासात कोणताही दोष नसल्याचं न्यायालयानेच स्पष्ट केलं हे बरं झालं. पण यानिमित्ताने बिहारची राजकीय पोळी भाजण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचं नाव देशात कमी करण्याचं ‘उदात्त’ कार्य केल्याबद्दल भाजपाच्या नेत्यांना साष्टांग दंडवत,” असं म्हणत रोहित पवार यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं. “आधी ‘कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा’ आणि राज्यातील सत्ता गमावल्यानंतर ‘मेरा अंगण मेरा रणांगण’ या घोषणेतून तर आता सुशांत सिंह प्रकरणातून भाजपाने राज्याचा नावलौकिक घालवण्याचंच काम केलं. अरे जनता तुम्हाला माफ करणार नाही,” अशा तिरकस शब्दांत रोहित पवार यांनी भाजपला धारेवर धरलं.
आधी 'कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा' आणि राज्यातील सत्ता गमावल्यानंतर 'मेरा अंगण मेरा रणांगण' या घोषणेतून तर आता सुशांत सिंह प्रकरणातून भाजपाने राज्याचा नावलौकिक घालवण्याचंच काम केलं.
'अरे जनता तुम्हाला माफ करणार नाही.'— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 19, 2020
दरम्यान, सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाबद्दल न्यायालयाने बुधवारी (१९ ऑगस्ट) निर्णय सुनावताना, मुंबई पोलिसांना सर्व पुरावे सीबीआयकडे हस्तांतरित करण्यास सांगितलं. तसंच सीबीआयला तपासात सहकार्य करण्यासही सांगितलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने पाटणा येथे रिया चक्रवर्तीविरोधात दाखल झालेला एफआयआर योग्य असल्याचं यावेळी म्हटलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”