करोनाने केला भारतीय सैन्यावर हमला; एक जवान करोना व्हायरस पॉझिटिव्ह

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात दहशत पसरली आहे. देशभरात या व्हायरसने ३ जणांचा मृत्यू झाला असून बळी पडणाऱ्यांची संख्या वाढण्याची भीती आहे. दरम्यान, भारतीय सैन्यातील एक जवान करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. वृत्तसंस्था एएनआयने सैन्य स्रोतांच्या आधारे दिलेल्या वृत्तात सांगितले की, भारतीय सैन्यातील एका ३४ वर्षीय जवानाला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. … Read more

चांगली बातमी! गेल्या २४ तासात सापडला फक्त एक कोरोना रुग्न

पुणे | कोरोना व्हायरसने सध्या जगभर थैमान घातले आहे. देशात कोरोना रुग्नांची संख्या १२७ वर पोहोचली आहे. अशात महाराष्ट्रात कोरोना रुग्नांची संख्या ४० वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासात पुण्यातकेवळ १ कोरोना रुग्न सापडला आहे. राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात सापडले आहेत. पुण्यातील कोरोना रुग्नांची संख्या आता १७ वर पोहोचली आहे. मात्र गेल्या २४ तासांत … Read more

Coronavirus : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, या’ गाड्या ३१ मार्चपर्यंत राहणार बंद

Indian Railway

मुंबई | भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता १२६ वर गेला आहे. देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्तमहाराष्ट्रात असल्याचे समोर आले आहे. राज्यात एकुण ४० कोरोना रुग्न सापडले आहेत. यापार्श्वभुमीवर मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. Coronavirus Latest Maharashtra Update हाती आलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेने १७ मार्च ते ३१ मार्च पर्यंत लांब पल्ल्याच्या गाड्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास … Read more

महाबळेश्वरला कोरोनाची धास्ती; व्यावसायिकांना मोठा फटका

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखणाऱ्या थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वरमध्ये देश-विदेशातून हजारो पर्यटक येत असतात. देशात कोरोनाचे रुग्ण आढळत असताना महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसची धास्ती महाबळेश्वरच्या स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनी घेतली आहे. महाबळेश्वरचे नेहमी गजबजलेले मार्केट आज ओस पडलेले दिसत आहे. याचा फटका स्थानिक व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. … Read more

हुश्श! सातार्‍यातील ‘त्या’ कोरोना संशयिताचा रिपोर्ट निगेटिव्ह पण…

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोनाने सध्या जगभरात थैमान घातले असून सातार्‍यातही कोरोनाचा एक रुग्न सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र सदर कोरोना संशयिताचा आज मेडिकल रिपोर्ट आला असून तो निगेटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सातारकरांनी आता हुश्श म्हणत निश्वास सोडलाय. रविवारी संध्याकाळी सातारा जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला संशयित सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. … Read more

कोल्हापुरातील 44 पर्यटक जैसलमेरला लष्कराच्या अलगीकरण कक्षात

कोल्हापूर | तेहरानमधील अडकलेले कोल्हापूर व परिसरातील ४४ पर्यटक दिल्लीमध्ये आले असून तिथे धावपट्टीच्या आवारातच तपासणी करून त्यांना जैसलमेरला लष्कराच्या अलगीकरण कक्षात पाठवण्यात आले आहे. तिथे चौदा दिवस निगराणीखाली ठेवण्यात येणार असून त्यानंतर पुन्हा तपासणी करुन घरी पाठवण्यात येणार आहे. इराण व इराकमधील धार्मिक पर्यटनासाठी गेलेल्या व ‘करोना’मुळे तेहरानमध्ये ४४ पर्यटक अडकले होते. त्यामध्ये कोल्हापूर, … Read more

कोरोनामुळे बुद्धिबळ खेळाडू जगज्जेता विश्वनाथ आनंद अडकला जर्मनीत

मुंबई | करोना व्हायरसमुळे सध्या देशात नव्हे तर देशभरात भीतीचे वातावरण आहे. कोरोनाचा फटका हा सगळ्यांचा बसतोय त्यात आता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद हे नाव सुद्धा समाविष्ट झाले आहे.बुंडेसलीगा चेसमध्ये पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियन असलेला विश्वनाथन आनंद,जो सध्या एससी बॅडेनसाठी खेळत होता, तो सध्या जर्मनीमध्ये असून आता हा इव्हेंटही कॅन्सल करण्यात आला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विश्वनाथ … Read more

कोरोनाचा झटका, गुंतवणूकदारांना ६.२५ लाख कोटींचा फटका

मुंबई | शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना ‘कोविड-१९’मुळे जबरदस्त आर्थिक फटका बसला आहे. आज सोमवारी गुंतवणूकदारांना ६.२५ लाख कोटींचा फटका बसला. मुंबई शेअर बाजारात आज सोमवारी सकाळच्या सत्रात सेन्सेक्स २ हजार १८२ अंकांनी कोसळला. अर्थव्यवस्थेवरील ‘कोविड-१९’चे सावट आणखी दाट होण्याची भीती गुंतवणूकदारांना आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेअरविक्री करण्यावर त्यांनी भर दिला. इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक … Read more

राज्यात कोरोनाची संख्या ३८ वर, यवतमाळ येथे आणखी एक रुग्ण

यवतमाळ | राज्यात कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा आकडा वाढतच चालला आहे. एक नवा रुग्ण यवतमाळमध्ये आढळून आला आहे.यवतमाळमधील रुग्णांची संख्या तीनवर पोहोचली आहे. तर राज्यात एकूण ३८ रुग्ण झाले आहेत. मुंबईत तीन तर नवी मुंबईत एक अशा चार रुग्णांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. आता अमरावतीमधील रुग्णाची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. राज्यातल्या १० शहरांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले. … Read more

Coronavirus : राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा पुढे ढकलणार

मुंबई | राज्यात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे आढळल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनाचे 38 जण रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्व स्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत. कोरोनाविषयी आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव … Read more