बँक कर्मचाऱ्यांचा खासगीकरणाला विरोध, ५० कोटींचे बँक व्यवहार ठप्प

औरंगाबाद | बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधात सोमवारपासून बँक अधिकारी, कर्मचारी दोन दिवसांपासून संपावर गेल्याने ५० कोटींचे बँक व्यवहार ठप्प झाल्याचे पाहायला मिळाले. शहर आणि ग्रामीण भागात संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, तब्बल तीन हजार बँक कर्मचाऱ्यांनी त्यात सहभाग घेतला. सरकारने आयडीबीआय आणि दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाची घोषणा केली आहे. याविरोधात युनायटेड फोरम आॅफ बँक युनियनतर्फे … Read more

वाळूज महानगरीत दीड महिन्यात ४२५ कोरोनाबाधित, २ कोवीड सेंटरमध्ये १९१ रूग्णांवर उपचार

औरंगाबाद |  वाळूज उद्योगनगरीला कोरोनाचा विळखा वाढत चालला असून, दीड महिन्यात ४२५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या भागातील दोन कोवीड सेंटरमध्ये १९१ कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. परिसरातील मुख्य बाजारपेठा, भाजीमंडई तसेच कंपन्यांमध्ये अनेक जण मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टंसिंगचा वापर करीत नसल्यामुळे कोरोना रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जि.प.चे मुख्य कार्यकारी … Read more

१ लाख २७ हजार विद्यार्थी देताहेत पदवी परीक्षा, ऑफलाईन परीक्षेसाठी २१२ केंद्रे

औरंगाबाद | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय व तृतीय वर्षाच्या परीक्षा मंगळपासून सुरू झाल्या. २१२ परीक्षा केंद्रांवर १ लाख २७ हजार ७८७ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. पदवी अभ्यासक्र माच्या दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाच्या परीक्षांना मंगळवार, १६ मार्चपासून सुरूवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर कुलगुरू डॉ. येवले यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. औरंगाबाद, जालना, … Read more

जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक, धर्मगुरु, पुजारी, महंतांना सहकार्य करण्याचे आवाहन

औरंगाबाद | विविध धर्मगुरु, पुजारी, महंत यांनी प्रशासन आणि जनतेतील दुवा व्हावे व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात विविध धर्मगुरु तसेच धार्मिक स्थळांचे प्रमुख यांची बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण बोलत होते. समाजात धर्मगुरूंना मानाचे स्थान आहे. आपण सांगितलेलं लोक ऐकतात. आपला … Read more

कोरोना निर्बंध तोडणाऱ्यांवर कडक कारवाई ; जिल्हाधिकारी,पोलीस आयुक्त,मनपा आयुक्तांनी रस्त्यावर उतरून केली कारवाई

औरंगाबाद: जिल्हाधिकारी सुनील चव्हाण,पोलीस आयुक्त डॉ.निखील गुप्ता आणि मनपा आयुक्त अस्तिक कुमार पांडे यांनी अंशतः लॉकडाउनच्या पहिल्याच दिवशी स्वतः शहरांमध्ये फिरून कोरोनाचे नियम मोडणाऱ्या नागरिक,दुकांदारावर कारवाई केली. जिल्हाधिकारिसह दोन्ही आयुक्त रस्त्यावर उतरल्याने नियम मोडणाऱ्यांचे धाबे दणाणले. राज्या पाठोपाठ शहरांमध्ये देखील कोरोना डोकंवर काढतोय, कोरोनाच संकट हे दिवसेंदिवस वाढतच चालल आहे. त्यामुळे प्रशासन चांगलेच ॲक्शन मोडमध्ये … Read more