उद्या सकाळी ८ पासून ‘मतमोजणी’ सुरुवात; उमेदवारांसह कार्यकर्त्यांचीही धाकधूक वाढली

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आता सर्वांना निवडणूक निकालाची उत्सुकता लागली आहे. महाराष्ट्रात पुन्हा आघाडीला धोबीपछाड देत युती सत्तेवर येणार की युतीला धक्का देत आघाडी बाजी मारणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

साताऱ्यातील ईव्हीएम घोटाळ्याची तक्रारच बोगस; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा खुलासा

४५ सातारा लोकसभेसाठी आणि २५७ कोरेगाव विधानसभा मतदारसंघात झालेल्या मतदानावेळी कोणतंही बटण दाबलं तरी मत कमळाला जात असल्याची तक्रार करण्यात आली होती. दीपक रघुनाथ पवार या व्यक्तीने ही तक्रार दिली होती. मात्र सदर व्यक्तीला याच तक्रारीसाठी लेखी जोडपत्र क्रमांक १५ भरून देण्यास सांगितलं असता या उमेदवाराने टाळाटाळ केली. माध्यमातून ही घटना मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर जिल्हा व केंद्र निवडणूक प्रमुखांनी या घटनेकडे तात्काळ लक्ष देऊन याचा खुलासा केला.

‘पवार फॅक्टर’मुळे ‘सेना’ चिंताग्रस्त; शिवसेनेची ५७ जागांवर राष्ट्रवादीशी लढत

विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षांकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकहाती प्रचाराचा धडका लावल्यामुळे महायुती सत्तेवर येण्याची खात्री असूनही शिवसेना चिंतित आहे.

जळगाव महापालिकेचे नवे शिलेदार

Thumbnail 1533402339929

जळगाव | महापालिका निवडणुकांचा निकाल नुकताच जाहीर झाला असून जळगाव महापालिकेवरील सुरेश जैन यांची सलग ३५ वर्षांची सत्ता संपुष्टात आली आहे. जळगाव महापालिका निवडणकांत भाजप ला ५७ जागी दणदणीत विजय मिळाला आहे. पालिकेच्या ७५ जागांसाठी एकुण ३०३ उमेदवार उभे राहीले होते. त्यापैकी ५७ जागांवर विजय मिळवत भाजपा ने जळगावात झेंडा रोवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि … Read more