जिल्हा परिषदेच्या सर्व यंत्रणांनी समन्वयाने महिला दिनाचे नियोजन करावे- हसन मुश्रीफ

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ‘उमेद’ आणि जिल्हा परिषदेच्यावतीने येथील तपोवन मैदानावर सकाळी 11 ते 1 या वेळेत जागतिक महिला दिन होणार आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व यंत्रणांनी समन्वयाने नियोजन करावे, असे निर्देश ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज दिले. शासकीय विश्रामगृहातील राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी महिला … Read more

लोकशाही दिनाचा नागरिकांनी लाभ घ्यावा- ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ

३ फेब्रुवारीपासून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणाऱ्या लोकशाही दिनाला मी स्वत: तसेच पालकमंत्री सतेज पाटील आणि सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर उपस्थित राहणार आहेत. शासकीय विश्रामगृहातील राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात सकाळी 11 ते 2 या वेळेत होणाऱ्या लोकशाही दिनाचा जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज केले.

वजनदार ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफांच्या गळ्यात 500 किलोचा हार

हसन मुश्रीफ यांचा भव्य नागरी सत्कार करताना त्यांना ५०० किलोचा हार घालण्यात आला.

कोल्हापूर जिल्हा परिषदेत सत्ता बदलाचे संकेत; महाविकासआघाडीने सत्तेसाठी कंबर कसली

कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची पुन्हा सत्ता आणण्याचा निर्धार काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार पी. एन. पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांनी बोलून दाखविला. जि.प.च्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी बुधवारी दोन्ही काँग्रेसच्या सदस्यांशी संवाद साधला. ‘राज्यामध्ये दोन्ही काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन महाविकासआघाडीच्या सरकारची स्थापना झाली. राज्यातील महाविकास आघाडीचा पॅटर्न जिल्हा परिषदेत आकाराला येईल. शिवसेनेचे दहा सदस्य दोन्ही काँग्रेस आघाडीसोबत येतील,’ असेही आमदार पाटील यांनी सांगितले. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात बैठक झाली. सदस्यांना भेटण्याअगोदर मुश्रीफ व पाटील यांची संयुक्त बैठक झाली. त्यानंतर त्यांनी सदस्यांशी संवाद साधला.

हसन मुश्रीफांनी निकाला आधीच उधळला गुलाल !

विधानसभा निवडणुकीचं मतदान सोमवारी किरकोळ घटना वगळता शांततेत पार पडले. मतदानानंतर आता सगळ्यांचं लक्ष निकालाकडे लागलेलं असताना पुण्यासह राज्यात काही उमेदवारांनी मतदान संपल्यानंतर फटाके फोडून जल्लोष केला. निकाला तीन दिवस बाकी असतानाच उमेदवारांनी फटाके फोडल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

कागलमध्ये राजकीय वातावरण तापलं; नेत्यांच्या सभा, कार्यकर्त्यांच्या ‘फिल्डिंग’ला वेग

राज्याचे राजकीय विद्यापीठ म्हणून ओळख असलेल्या ‘कागल’चे राजकिय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. हसन मुश्रीफ गट, संजय घाटगे गट, मंडलिक गट, समरजित घाटगे गट यांच्यामध्ये चांगलेच राजकारण व रस्सीखेच दिसत आहे. राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाकडून हसन मुश्रीफ यांनी सहाव्यांदा विधानसभेसाठी अर्ज भरला आहे. मुश्रीफांना दुसरी हट्रिक करण्याची संधी पुन्हा एकदा मिळणार असल्याची चर्चा सध्या जोरदार या विधानसभा मतदार संघात ऐकायला मिळत आहे.