श्वानप्रेमिंनो सावधान ! …अन्यथा श्वान होईल जप्त

Dog breeding

औरंगाबाद – कोरोना लॉकडाऊनमध्ये मुलांचा विरंगुळा म्हणून अनेक पालकांनी पाळीव प्राणी घेतले. यामध्ये श्वानांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्याचप्रमाणे हौशी श्वानप्रेमींची संख्याही मोठी आहे. मात्र, अनेक नागरिक श्वान परवाना महापालिकेकडून घेत नाहीत. त्यामुळे महापालिकेने 1 जानेवारी 2022 पासून परवाना नसलेले श्वान जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या नागरिकांनी श्वान परवाना घेतला नाही, त्यांनी त्वरित महापालिकेच्या मध्यवर्ती … Read more

दुचाकीस्वारांना वाचविताना ट्रक पलटला; कोल्ड्रिंक्सचे बॉक्स घेण्यासाठी नागरिकांची झुंबड

accident

औरंगाबाद – राँग साईडने आलेल्या ट्रिपल सीट दुचाकीस्वारांना वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रक रस्त्याखाली गेल्याची घटना सकाळी 11:30 वाजेच्या सुमारास मुंबई-नागपूर महामार्गावरील तीसगावच्या खवड्या डोंगराजवळ घडली. यामुळे दुचाकीस्वार वाचले परंतु, ट्रक उलटून शीतपेयाचे बॉक्स खाली पडले. यामुळे शीतपेयांचे बॉक्स लांबविण्यासाठी वाहनधारक व नागरिकांची झुंबड उडाली होती. गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील कोकाकोला या कंपनीतुन शितपेयाचे बॉक्स भरुन आर.के.ट्रॉन्सपोर्टचा … Read more

जिल्हा हळहळला ! सिल्लोड तालुक्यात शेतकरी दांपत्याची आत्महत्या

suicide

औरंगाबाद – सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरी येथील पती-पत्नीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी घडली. पत्नी ने विहिरीत उडी घेऊन तर पतीने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली आहे, सततच्या नापिकीला कंटाळून दांपत्याने टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा असून आत्महत्या करणाऱ्या दांपत्याला दोन चिमुकले असून त्यांच्या अकाली जाण्याने परिसरासह जिल्हात हळहळ व्यक्त होत आहे, याविषयी अधिक माहिती … Read more

ओमिक्रॉनसाठी मनपाचा 30 कोटींचा आराखडा

औरंगाबाद – कोरोना संसर्गाचा ओमिक्रॉन हा घातक विषाणू आढळून आल्यानंतर प्रशासन पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. महापालिका प्रशासनाने पुन्हा कोरोनाचा फैलाव झालच तर उपाययोजना म्हणून 30 कोटी रुपयांचा आराखडा केला आहे. तसा प्रस्ताव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे सादर करण्यात आला असल्याचे महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले. यासंदर्भात पांडेय यांनी सांगितले की, डिसेंबर ते मार्च … Read more

खळबळजनक ! विद्यापीठात कोट्यावधींचा गैरव्यवहार

bAMU

औरंगाबाद – मराठवाड्यातील शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सन 2017 मध्ये तत्कालीन कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या कार्यकाळात कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचे विधिमंडळाच्या आश्वासन समितीच्या चौकशी अहवालात समोर आले आहे. विद्यापीठात कुठल्याही प्रकारची निविदा प्रक्रिया न राबवता मर्जीतील कंत्राटदाराकडून साहित्य खरेदी करणे, विद्यार्थी संख्येपेक्षा दुपटीने प्रश्नपत्रिकांची छपाई करण्याचे कंत्राट देणे, महाविद्यालयांकडून … Read more

मनपा निवडुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे औरंगाबादेत

Raj Thackarey

औरंगाबाद – आगामी औरंगाबाद मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सहा विभागांमध्ये दौरे आयोजित केले आहेत. या दौऱ्यांमध्ये ते सर्वप्रथम मराठवाड्याच्या भेटीला येत आहेत. येत्या 14 डिसेंबर रोजी राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर येणार आहेत. ही माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मुंबईत झालेल्या एका बैठकीत दिली. यामुळे आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे … Read more

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी एकाही झाडाची कत्तल नको ! खंडपीठाने फटकारले

High court

औरंगाबाद – शहरातील एमजीएम विद्यापीठात प्रियदर्शिनी उद्यानात बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे काम सुरु आहे. मात्र या प्रकल्पासाठी झाडांची अनावश्यक कत्तल होत असल्याची याचिका मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली होती. यासंदर्भात विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर आणि तीन वकिलांच्या समितीने स्वतंत्रपणे पाहणी अहवाल सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. हा अहवाल गुरुवारी कोर्टासमोर सादर करण्यात … Read more

महापालिका काढणार 300 कोटींचे कर्ज

aurangabad mahanagar

औरंगाबाद – औरंगाबाद महापालिकेला स्मार्ट सिटी प्रकल्पात आपल्या वाट्याचा निधी टाकायचा आहे. त्यामुळे हा हिस्सा टाकण्यासाठी महापालिकेने तीनशे कोटी रुपयांचे कर्ज घेण्याचा निर्णय घेतला आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाचा हिस्सा वापरल्यानंतर उरलेला निधी विकास कामांसाठी वापरला जाणार आहे. याकरिता एशियन डेव्हलपमेंट बँक आणि कार्बन झिरो बाँडच्या विक्रीतून हे कर्ज मिळवण्यात येणार असल्याचे मनपा प्रशासक आस्तिक कुमार … Read more

औरंगाबादला दिलासा ! आफ्रिकेतून आलेला ‘तो’ विद्यार्थी नेगेटिव्ह

Corona Test

औरंगाबाद – संपूर्ण जगाने धसका घेतलेल्या कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा आपल्या भागात शिरकाव होऊ नये, यासाठी स्थानिक पातळीसह देशभरातील यंत्रणा खबरदारी घेत आहे. दक्षिण आफ्रिकेत हा विषाणू सर्वप्रथम आढळून आल्याने तेथून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर आफ्रिकेतून औरंगाबादेत आलेल्या विद्यार्थ्याबाबत साशंकता निर्माण झाली होती. मात्र त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याने औरंगाबादला दिलासा मिळाला आहे. … Read more

कोरोना टेस्ट करत आहोत म्हणत शस्त्राचा धाक दाखवून टाकला दरोडा

crime

बीड – कोरोना टेस्ट करत आहोत, असे म्हणत जिल्ह्यातील माजलगाव शहरापासुन जवळच असलेल्या भाटवडगाव येथील शिक्षक कॉलनीत गुरूवारी सहा अज्ञात दरोडेखोरांनी घरातील वृद्ध दाम्पत्यास शस्त्राचा धाक दाखवून काठीने मारहाण केली व दरोडेखोरांनी घरातील सोन्या- चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा अडीच लाख रूपयांचा ऐवज लूटत पळ काढला. शहरालगतच असलेल्या भाटवडगाव येथील शिक्षक कॉलनीत शेतकरी असलेले लक्ष्मणराव … Read more