व्यवसायासाठी माहेरहून पैसे आण म्हणत, पत्नीचा अमानुष छळ; पतीविरुद्ध गुन्हा दाखल

rape

औरंगाबाद : माहेराहून व्यवसायासाठी पैसे आण म्हणत हातापायाला व तोंडाला चटके देऊन एका २८ वर्षीय विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार वाळूज परिसरात समोर आला आहे. तसेच पत्नी व सासूला शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पतीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबद्दल सविस्तर वृत्त असे की, सदर महिला शाहिस्ता हिचे … Read more

राजकारण होऊनही शहरातील ‘इतक्या’ नागरिकांचे लसीकरण

औरंगाबाद – कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण शहरात सुरु असून शहरातील ६ लाख नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली आहे. मात्र अजूनही ४५ हजार नागरिक हे दुसरा डोस घेण्यासाठी प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे शहरातील आणखी ५ लाख ७७ हजार नागरिकांचे लसीकरण होणे बाकी आहे, असे मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले आहे. औरंगाबाद शहरात १८ वर्षांवरील नागरिकांचा … Read more

धोंड्यातील अंगठी, चार लाख हुंड्यासाठी विवाहितेचा छळ

Crime

औरंगाबाद : धोंड्याची कार्यक्रमात अंगठी आणि चार लाख रुपये हुंडा दिला नाही म्हणून एका 25 वर्षीय विवाहितेला मारहाण करून सासरच्या मंडळींनी छळ केला. या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात पतीसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप गोकुळ पोटे, गोकुळ त्रिंबक पोटे, मंगल गोकुळ पोटे, प्रदीप गोकुळ पोटे, कविता उमेश भोगे, जयश्री विठ्ठल गवळी (रा.शंकरपूर, … Read more

शहरात मनपा सुरू करणार आणखी चार पेट्रोल पंप

aurangabad

औरंगाबाद – शहरातील मध्यवर्ती जकात नाक्याजवळ मनपाने मागील काही दिवसांपूर्वीच एक पेट्रोल पंप सुरू केला आहे आता शहरात आणखी चार ठिकाणी मनपाच्या वतीने पेट्रोल पंप सुरू करण्यात येणार आहेत त्यासाठी जागा आणि पेट्रोलियम कंपन्यांना क्रिकेट ठरवण्यात आल्या असून लवकरच पेट्रोल पंपांची उभारणी केली जाणार आहे. याविषयी बोलताना शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी सांगितले की, पेट्रोल … Read more

खंडापीठाने विद्यापीठाला बजावली कारणे दर्शक नोटीस

bAMU

औरंगाबाद | विद्यापीठामध्ये इंग्रजी विषयात पी एच डी साठी प्रवेश देण्यात यावा, या अनुषंगाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व विद्यापीठ अनुदान आयोगास कारणे दर्शक नोटीस बजावण्याचा आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्या. आर.एन. लढ्ढा यांनी दिला आहे. संशोधक चंद्रशेखर भाऊराव जाधव यांनी ॲड. शिरिष कांबळे यांच्यामार्फत दाखल … Read more

आठ दिवसात पुलाचे काम सुरू करा – आमदार प्रदीप जैस्वाल

pradeep jaiswal

औरंगाबाद | सध्या पावसाळा सुरु झाला असून रस्तावरील खड्ड्यामध्ये पाणी साचते. ते पाणी घरात येऊ नये म्हणून दलालवाडीतील औषधीभवन येथील नाल्यावरील पुलाची उंची वाढवण्याचे काम सूरु होते. परंतु कंत्राटदाराने नाल्यातील कचरा न काढताच बांधकाम सुरू केल्यामुळे बांधकामास स्थगिती मिळाली आहे. त्याचबरोबर याप्रकरणी या कंत्राटदारावर कारवाई करण्याचा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी दिला होता. आता या … Read more

कारची दुचाकीला धडक चार जण गंभीर जखमी

accident

औरंगाबाद |  कार चालवताना नियंत्रण सुटल्याने समोरून जाणार्‍या भरधाव दुचाकीला धडक देऊन दगडावर जाऊन पलटी झाली. 28 जुलै रोजी फुलंब्री औरंगाबाद रस्त्यावरील गणोरी फाट्याजवळ ही घटना घडली. यावेळी चार जण जखमी झाले आहेत. दुचाकीचालक प्रकाश जनार्दन शिंदे (22 रा. पळशी तालुका सिल्लोड) मनोज अर्जुनराव माळी (27) युवराज ईश्वर परदेसी (57) रघुनाथ चव्हाण (57 रा. जळगाव … Read more

नळ कनेक्शन तोडणे आले अंगलट; मनसेच्या पदाधिकाऱ्यांना अटक

औरंगाबाद |  कोणतीही परवानगी न देता मनपा आयुक्तच्या शासकीय बंगल्याचे नळ कनेक्शन अनधिकृतपणे कापले याप्रकरणी सिटी चौक पोलिसांनी 28 जुलै रोजी सकाळी मनसेच्या सहा पदाधिकाऱ्यांना अटक केली आहे. 29 जुलै पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी माने यांनी दिली आहे. मनसेचे जिल्हा संघटक बिपिन शंकर सिंग नाईक (37, विराज नगर गादिया विहार गारखेडा) … Read more

पदवी अभ्यासक्रमाच्या ऑनलाईन परीक्षा 29 जुलै पासून

BAMU

औरंगाबाद | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑनलाईनच पद्धतीने होणार आहेत. 29 जुलैपासून पदवीच्या द्वितीय व तृतीय वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने सुरू होणार आहेत. अशी माहिती मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर योगेश पाटील यांनी दिली आहे. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली मार्च-एप्रिल 202 च्या परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या … Read more

नागरिकांनी शिस्त नाही पाळली तर ऑनलाईन नोंदणी केली जाईल – डॉ. नीता पाडळकर

corona vaccine

औरंगाबाद : जिल्ह्यात लसींचा तुटवडा भासत आहे, केंद्रावर लसी उपलब्ध आहे पण लसीकरण केंद्रावर टोकन वाटपावरून हाणामारी झाल्याचे अनेक प्रकार समोर येत आहे. या कारणामुळे महापालिका प्रशासन सावध झाले असून, नागरिकांनी शिस्त पाळली नाही तर ऑनलाईन पद्धतीने नोंदणी बंधनकारक करण्यात येईल. महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सोमवारी असे सांगितले की, आता नऊ … Read more