बनावट सोने देऊन सव्वीस लाखांचा चुना लावणारा अटकेत

Gold Stolen

औरंगाबाद : निशांत मल्टीस्टेट को – क्रेडिट सोसायटी लि. अकोलाच्या रेल्वे स्टेशन रोड औरंगाबाद या शाखेत बनावट सोने ठेवून 26 लाख 23 हजार रुपयांचा गंडा घातलेल्या प्रकरणी वेदांत नगर पोलिसांनी मंगळवारी दुपारी एका महिलेला अटक केली आहे. लिलाबाई राजू मस्के वय 34 (रा. मुकुंदवाडी) असे आरोपी महिलेचे नाव आहे. तिला न्यायालयीन कोठडी करण्याचे आदेश मुख्य … Read more

रोहयो कामांच्या लेबर बजेट बद्दल विभागीय आयुक्तालयात कार्यशाळेचे आयोजन

Rohyo works

औरंगाबाद | 2022-23 या आर्थिक वर्षांमध्ये रोहयो कामांच्या लेबर बजेटची आखणी करण्याची सूचना राज्याचे मृद, जलसंधारण आणि रोहयो विभागाचे अप्पर मुख्य सचिव नंदकुमार यांनी विभागातील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केली. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत 2022-23 या आर्थिक वर्षात रोहयो कामांच्या लेबर बजेट बद्दल विभागीय आयुक्तालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अपर … Read more

मराठवाड्याचे रेल्वे प्रश्न आता दानवेंच्या हाती; रेल्वेच्या सर्व समस्या आता मार्गी लागणार ?

औरंगाबाद : केंद्रीय मंत्रिमंडळात रावसाहेब दानवे यांना एका अर्थाने बढती मिळाली आहे. रेल्वे मंत्रालयासारख्या महत्त्वाच्या खात्याच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली आहे. त्यांच्या या बढतीमुळे मराठवाडा आणि एकूणन महाराष्ट्रातील नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील म्हणजेच पर्यायाने मराठवाड्यातील रेल्वेचे प्रलंबीत प्रश्न मार्गी लागण्याची आशा वाढली आहे. रेल्वेच्या बाबतीत महाराष्ट्राचे दोन भाग झाले आहेत. त्यात … Read more

ग्रामीण भागात धुमाकूळ घालणारी घटफोडयांची टोळी गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

औरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर आणि शिल्लेगाव भागात घरफोडी करून धुमाकूळ घालणाऱ्या टोळीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या असून त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम दुचाकी असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. फकिरचंद चंद्रभान काळे त्याची पत्नी मिनाबाई फकिरचंद काळे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. अलीकडच्या काळात शिल्लेगाव व गंगापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात घरफोडीचे सत्र … Read more

जनावराने लाथ मारल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

औरंगाबाद : शेतात काम करत असताना अचानक गाईने लाथ मारल्याने शेतकरी गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला घाटी रुग्णालयाच्या ट्रॉमा विभागात दाखल करण्यात आले होते. चार दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र आता उपचार सुरू असताना अचानक मृत्यू झाला. संजय बाबु चव्हाण असे शेतकरी मृताचे नाव आहे. जटवाडा परिसरातील गाव अंधरी तांडा येथे राहत होते. त्याच … Read more

विद्यापीठात घनवन प्रकल्पाला सुरुवात; 6 हजार झाडांची केली जाणार लागवड

bAMU

औरंगाबाद | वाढत्या शहरीकरणामुळे ‘सिमेंट’चे जंगल निर्माण होत आहे. हे थांबवण्यासाठी आणि विद्यापीठ परिसर हिरवागार राहण्यासाठी बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात अर्धा एकर जागेमध्ये सहा हजार झाडांची लागवड करण्यात आली आहे. कमीत-कमी जागेत जास्तीत जास्त झाडांच्या लागवडीचा मियावाकी घनवन प्रकल्प हा राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून साकरण्यात आला आहे. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या हस्ते या … Read more

चिंताजनक! गेल्या 24 तासात 48 नवे कोरोना रुग्ण; 2 जणांचा मृत्यू

aurangabad corona

औरंगाबाद : जिल्ह्यात नव्याने होणाऱ्या कोरोनाग्रस्तांची संख्या पन्नास खाली कायम असून, बुधवारी दिवसभरात 48 रुग्णांची वाढ झाली. यात मनपा हद्दीतील एकोणवीस ग्रामीण भागातील 21 रुग्णांचा समावेश आहे. उपचार सुरू असताना दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या 463 रुग्णांवर उपचार सुरू आहे. शहरातील नव्या रुग्णांची संख्या सलग 13 व्या दिवशी वीस खाली राहिली. त्यात ही सक्रिय … Read more

इंधन दरवाढ व महागाई विरोधात बैलगाडी, उंट, घोडे, सायकल चालवत काँग्रेसचे अनोखे आंदोलन

Congress Movement

औरंगाबाद | इंधन दरवाढ व जीवनावश्यक वस्तूंच्या महागाई विरोधात औरंगाबाद शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले. यावेळी सरदार वल्लभ भाई पटेल पुतळा, शाहगंज ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली. पेट्रोल डिझेलचे वाढते भाव तसेच गॅसचे वाढलेले भाव याविरोधात आज काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यव्यापी जनआंदोलन करण्यात येत आहे. औरंगाबाद येथे वाढलेल्या … Read more

आता भाड्याच्या घरात चालणाऱ्या अंगणवाडीपासून मिळणार सुटका; जिल्हयात अंगणवाडीसाठी उभारणार 116 इमारती

Anganwadi

औरंगाबाद | जिल्हा परिषदेकडून जिल्हा वार्षिक योजनेमध्ये 116 नवीन अंगणवाड्यांकरिता दहा कोटींचा निधी मंजूर केला आहे, तसेच या इमारतींचे बांधकाम 9 महिन्यांत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत जिल्हाभरात भाड्याच्या घरात चालणाऱ्या अंगणवाड्यांना आता स्वतंत्र इमारती मिळणार आहेत. खेड्या गावातील गरीब कुटुंबातील मुलांना लहान वयात सकस आहार मिळत नाही. यामुळे ग्रामीण भागातील मुले कुपोषित राहतात. … Read more

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने घेतली राज्यपालांची भेट; मांडले समाज हिताचे प्रश्न

औरंगाबाद : कोरोना काळात राज्यात सर्वत्र टाळेबंदी सातत्याने वाढवली जात आहे. यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. यात अनेक पालकांचे रोजगार बुडाले आहेत. खाजगी क्षेत्रांमधील नोकरी करणाऱ्या पालकांना त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला वेळेवर व योग्य त्या प्रमाणात मिळत नाही. त्यामुळे शाळा व महाविद्यालय प्रशासनाकडून भरमसाठ प्रमाणात आकारण्यात येणारे शैक्षणिक शुल्क पालक शाळा, महाविद्यालयांना देऊ शकत … Read more