निवडणूक रद्द न केल्यास सहकार मंत्र्यांना घालणार घेराव; आरपीआयच्या जिल्हाध्यक्षांचा इशारा

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके जावळी तालुक्यातील सोनगाव येथील प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुक जाहीर झाल्याने तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या कारखान्याच्या निवडणुकीस आता आरपीआय कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविला आहे. आज रिपाईचे जिल्हाध्यक्ष संजय गाडे यांनी उपनिबंधक जावळी यांच्याकडे तक्रारीचे निवेदन दिले. तसेच कारखान्याची निवडणूक रद्द न केल्यास सहकार मंत्र्यांना घेराव घालू, असा … Read more

कराड शहरातील रस्त्यांच्या कामाची गटनेते सौरभ पाटील यांच्याकडून पाहणी; अधिकाऱ्यांना केल्या सूचना

कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी मंजूर केलेल्या निधीतून कराड शहरामध्ये विविध विकासकामे सध्या सुरू आहेत. याच निधीमधून प्रभाग क्रमांक 10 मध्ये खडीकरण व डांबरीकरण करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान या कामांची आज लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील यांनी पाहणी केली. तसेच कामासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या. सध्या कराड शहरातील … Read more

बंडातात्या कराडकरांवर करणार बदनामीचा खटला दाखल ; बाळासाहेब पाटील यांचा इशारा

सातारा प्रतिनिधी। सकलेन मुलाणी ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी काल सातारा येथे करण्यात आलेल्या आंदोलनावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह साताऱ्याचे पालकमंत्री तथा आमदार बाळासाहेब पाटील यांचे चिरंजीव जशराज पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या प्रकरणी आता बंडातात्या कराडकर यांच्या वरती गुन्हा दाखल करून बदनामीचा खटला दाखल करणार असल्याचा … Read more

केंद्र सरकारचा साडेनऊ हजार कोटींचा प्राप्तीकर माफीचा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचाच – बाळासाहेब पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी केंद्र सरकारच्या वतीने एफआरपीपेक्षा जास्त भाव दिला म्हणून त्या फरकावरील रकमेवर लागू केलेला साडे नऊ हजार कोटी रुपयांचा प्राप्तिकर रद्द आणि साखर विकास निधी अंतर्गत घेतलेल्या कर्जाचे पुनर्गठन करण्याचा हे दोन निर्णय  घेण्यात आले. याबाबत राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले. केंद्र सरकारने घेतलेला … Read more

जल जीवन मिशन : पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रयत्नातून 5 कोटी 90 लाख रूपये मंजूर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महाराष्ट्र राज्याचे सहकार, पणन मंत्री तथा सातारा जिल्हा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे विशेष प्रयत्नातून जल जीवन मिशन कार्यक्रम सन 2021-22 मधून खालील गावांमधील नळ पाणी पुरवठा कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. सदर कामांमुळे संबंधीत गावांमधील पिण्याच्या पाण्याच्या योजनांना त्याचा लाभ होणार आहे. कराड उत्तर मतदार संघातील गावांना 5 कोटी 90 … Read more

चर्चा पालकमंत्र्यांच्या बॅनरची! बाळासाहेब पाटील यांचा 50 फुटी पोस्टर वेधतोय कराडकरांचे लक्ष

अक्षय पाटील | कराड प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचा नुकताच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीत कराड सोसायटी गटातून विजय झाला आहे. याच पार्श्वभूमीवर बाळासाहेब पाटील यांचा उभारलेला विजयी बॅनर सध्या जोरदार चर्चेत आहे. कराड शहरातील कृष्णा नाका परिसरात बाळासाहेब पाटील यांचा तब्बल 50 फुटी बॅनर उभारण्यात आला … Read more

निवडणुकीत हार जीत ही होतच असते; पराभवानंतर उदयसिंह पाटील उंडाळकरांनी मानले आभार

सातारा । सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. कराड दक्षिण मतदार संघाच्या दृष्टीने व जिल्ह्याच्या दृष्टीने मानल्या जाणाऱ्या या निवडणुकीत कराड सोसायटी गटातून सहकार मंत्री बाळासाहेब पाटील विजयी झाले. तर माजीमंत्री विलासकाका उंडाळकर यांचे काँग्रेसवासी पुत्र उदयसिंह पाटील उंडाळकर यांचा पराभव झाला. पराभवानंतर त्यांनी जनतेचे आभार मानले आहेत. “निवडणुक म्हटलं की … Read more

भाजप -राष्ट्रवादीची गठ्ठी, उंडाळकरांची इठ्ठी : सहकार मंत्री बाळासाहेब पाटील विजयी

सातारा | जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी भाजपच्या डॉ. भोसले गटाच्या साथीने अखेर कराड सोसायटी गटातून विजय मिळवला आहे. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी काँग्रेसचे अँड. उदयसिंह पाटील यांचा पराभव केला आहे. या विजयामुळे कराड तालुक्यात भाजप -राष्ट्रवादीची नवी युती उदयास आली आहे. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना 74 तर अडवोकेट उदय … Read more

सातारा जिल्हा बँक निवडणूक : निकालाआधीच सहकारमंत्र्यांचा विजयी बॅनर; अतुल भोसलेंच्या फोटोने राजकीय वर्तुळात चर्चा

Satara DCC Election Result

कराड : राज्याचे लक्ष लागलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीच्या कराड सोसायटी गटात काल रविवारी शांततेत 100 टक्के मतदान झाले. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील आणि अॅड. उदयसिंह पाटील यांच्यात कराड सोसायटी गटातून काटे की टक्कर पहायला मिळाली. मतदानाच्या दिवशी भाजप नेते अतुल भोसले यांनी बाळासाहेब पाटील यांना उघड पाठिंबा दिल्यामुळे उदयसिंह पाटील यांना तोटा सहन करावा … Read more

सातारा जिल्हा बँक निवडणूक : सहकारमंत्र्यांच्या कराड सोसायटी गटात 100 टक्के मतदान

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. सहकारमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या कराड सोसायटी गटात दुपारी तीन वाजेपर्यंत 100 टक्के मतदान झाले. सहकारमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दुपारनंतर मतदानाचा हक्क बजावला. यावेळी सहकार पॅनेलच्या १० जागा विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. … Read more