बिहार- झारखंड मध्ये ED- CBI ची छापेमारी; आरजेडी नेते टार्गेटवर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । बिहार मध्ये सत्ताबदल होताच सीबीआय आणि ईडीने अनेक ठिकाणी छापेमारी सुरु केली आहे. जमीन देवाण-घेवाण प्रकरणी आरजेडी आमदार सुनील सिंग, माजी आमदार सुबोध रॉय, राज्यसभा खासदार अशफाक करीम आणि फयाज अहमद यांच्यावर छापेमारी करण्यात आली आहे. या संपूर्ण घटनेमुळे बिहारच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. बिहारमाधे नव्याने स्थापन झालेल्या नितीशकुमार यांच्या … Read more

कोचिंगसाठी निघालेल्या मुलीवर भरदिवसा गोळीबार, CCTV फुटेज आले समोर

girl shot dead

पाटणा : वृत्तसंस्था – बिहारमध्ये दिवसाढवळ्या एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये भररस्त्यावरच एका मुलीवर गोळीबार (girl shot dead) करण्यात आला आहे. पाटणा येथील बायपास परिसरात कोचिंगसाठी निघालेल्या मुलीवर एका व्यक्तीने गोळ्या झाडल्या (girl shot dead) आणि तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही घटना बुधवारी घडली … Read more

उपमुख्यमंत्री होताच तेजस्वी यादवांनी दिले ED, CBI ला निमंत्रण; म्हणाले की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकतीच नितीशकुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर यादव यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसेच केंद्रीय तपास यंत्रणेबाबतही मोठे विधान केले आहे. ‘सीबीआय, ईडी आणि आयकर विभाग या तपास यंत्रणांना मी आमंत्रण देत आहे. त्यांनी पाटणा येथील माझ्या निवासस्थानी … Read more

JDU- BJPचं कशामुळे तुटलं? मोदींनी सांगितलं कारण .. तर नितीशकुमारांचेही प्रत्युत्तर

Nitishkumar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपशी फारकत घेत काँग्रेस आणि आरजेडी सोबत सत्तास्थापन केलं. नितीशकुमार यांच्या या धक्कातंत्रामुळे भाजपला आणि पर्यायाने मोदी शहांना एकप्रकारे शह बसला. मात्र या मोठ्या राजकीय उलथापालथी नंतर भाजप नेते सुशील मोदी यांनी नितीशकुमार यांना उपराष्ट्रपती न केल्यानेच त्यांनी भाजपसोबत युती तोडली असा गौप्यस्फोट केला आहे. त्यावर नितीशकुमार … Read more

जे. पी. नड्डाच्या एका वक्तव्यामुळे बिहारमध्ये भाजपाची सत्ता गेली : आ. पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महाराष्ट्रात अडीच वर्षानंतर भाजपाची सत्ता शिंदे गटासोबत आलेली आहे. मंत्रिमंडळाची विस्तार झालेला आहे. त्यामुळे भाजपाची महाराष्ट्रात सत्ता येत असताना केवळ भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या एका वक्तव्यामुळे बिहारमधील सत्ता गमवावी लागली आहे. भाजपाचा छुपा अजेंडा उघड केल्यानेच नितिश कुमार यांनी नवा घरोबा केल्याचे काॅंग्रेसचे जेष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री … Read more

बिहारमध्ये जेडीयू -आरजेडीच सरकार स्थापन; नितीशकुमारांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बिहारमध्ये काल भाजपसोबत असलेली युती तोडत बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज पुन्हा बिहारमध्ये आरजेडी – जेडीयूचे सरकार स्थापन केले. बिहारचे नेते लालू प्रसाद यादव यांच्याशी हातमिळवणी केल्याने स्थापन झालेल्या या सरकारचा नुकताच शपथविधीही पार पडला. यावेळी नितीशकुमार यांनी आठव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यानू उपमुख्यमंत्रीपदाची शपथ … Read more

चित्रा वाघ यांनी नितीश कुमारांवर निशाणा साधत शिवसेनेला डिवचले; केलं ‘हे’ ट्विट

Chitra wagh Nitish kumar Shiv Sena

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बिहारमध्ये काल भाजपसोबत असलेली युती तोडत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी लालूप्रसाद आणि काँग्रेससोबत हातमिळवणी करत सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानंतर भाजपाकडून नितीशकुमार यांच्यावर टीका केली जात आहे. यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी नितीशकुमार यांच्यावर निशाणा साधता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना डिवचले आहे. ‘नितीश कुमार ज्या मार्गावर चालले आहेत, त्याला … Read more

100 वर्ष शेळी होण्यापेक्षा एक दिवसाचा सिंह बरा…; दानवेंकडून नितीश कुमारांचं कौतुक

Ambadas Danve Nitish Kumar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बिहारमध्ये काल चांगलाच राजकीय भूकंप झाला. बिहारचे नेते नितीश कुमार यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपबाबत त्यांनी घेतलेल्या या भूमिकेचे शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी कौतुक केले आहे. ‘शंभर वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस सिंहासारखं जगल्यास आयुष्य सार्थकी लागते. त्यामुळे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी … Read more

महाराष्ट्रात भाजपला धोका दिल्याने शिवसेना फोडली; सुशील मोदींचा गौप्यस्फोट

Sushil Modi Shiv Sena

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काल बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राजीनामा दिल्याने येथील सरकार कोसळले. त्यामुळे भाजपाला सत्तेबाहेर जावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर बिहारमधील भाजपाचे नेते व माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी संयुक्त जनता दलाचे प्रमुख नितीश कुमार यांना इशारा देताना महाराष्ट्रातील भाजपाने शिवसेना का फोडली? याचा मोठा खुलासा केला आहे. “महाराष्ट्रात शिवसेनेची भाजपासोबत युती होती. … Read more

बिहारमध्ये राजकीय भुकंप!! नितीशकुमार सरकार कोसळले

Nitish Kumar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी आज पार पडला. मात्र, बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून नितीशकुमार सरकार कोसळले आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपासून अधिकृतपणे फारकत घेतली आहे. ते आज दुपारी राज्यपाल फग्गु चौहान यांची भेट घेवून लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत नव्या आघाडी सरकारच्या स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. … Read more